मानवाच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आणि... Elon Musk चा आणखी एक भयानक प्रोजेक्ट

या प्रयोगाच्या माध्यमातून मानवी मेंदूत मेमरी चीप बसवली जाणार आहे. इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी(Neuralink is a neuroscience startup company) या प्रोजेक्टवर काम करत आहे.

Updated: Dec 1, 2022, 07:59 PM IST
मानवाच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आणि... Elon Musk चा आणखी एक भयानक प्रोजेक्ट title=

Elon Musk Brain Chip Project : Twitter खरेदीच्या डील पासून जगातील सर्वात मोठे उद्योगपती आणि टेस्लाचे सह-संस्थापक एलन मस्क(Elon Musk) त्यांच्या निर्णयामुळे सातत्याने चर्चेत आहेत.  एलन मस्क आता आणखी एका भयानक प्रोजेक्टवर काम करत आहेत. एलन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून मानवी मेंदूत मेमरी चीप बसवली जाणार आहे. इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी(Neuralink is a neuroscience startup company) या प्रोजेक्टवर काम करत आहे.

नवीन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून मानवी मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्यासाठी संशोधन सुरु आहे.  न्युरालिंक कपंनीने 2021 मध्ये या प्रोजेक्ट संदर्भातील एक व्हिडिओ जारी केला होता. एका माकडावर हा प्रयोग करण्यात आला. माकडाच्या मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्यात आली. तसेच डुकराच्या मेंदूत देखील अशा प्रकारची चीप बसवण्यात आलेय.

छोटया नाण्याच्या आकाराची ही कॉम्प्युटर चीप आहे. चीप बसवलेल्या प्राण्यांच्या हालचाली तसेच त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवले जात आहे.  त्यांच्या सर्व हालचालींचे बारकाईने निरीक्षण करुन त्याची नोंद ठेवली जात आहे. या प्रयोग सध्या यशस्वी टप्प्यावर असून लवकर अशा प्रकारच्या चीप प्रत्यक्षात मानवी मेंदूमध्ये बसवल्या जाणार आहेत.

मानवी मेंदूत बसवल्या जाणाऱ्या मेमरी चीपचा फायदा काय?

मानवी मेंदूमध्ये बसवलेल्या या चिपची क्षमता वाढवता येऊ शकते. या चीपच्या माध्यमातून मानवी मेंदू थेट संगणकाशी जोडला जाऊ शकतो.  मेंदूतील हालचालींची नोंद करता येवू शकतात. यामुळे मानवी मेंदूशी निगडीत आजारांवर उपचार करता येवू शकतात. स्पायनल कॉर्डच्या दुखापती, डिमेंशिया, अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या चीपची मदत होऊ शकते असा एलन मस्क यांच्या न्युरालिंकच्या संशोधकांचा दावा आहे. मानवी मेंदूवरील प्रयोग 2020 मध्ये प्रत्यक्षात आणण्याचा एलन मस्क यांचा प्रयत्न होता. मात्र, यास विलंब झाला आहे. इलॉक मस्क हे सातत्याने नव नवीन प्रयोग करत असतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवजातीवर हल्ला, नास्त्रेदमसची भविष्यवाणी

फ्रेंच संदेष्टा मायकेल डी नास्त्रेदमसने देखील याबाबत आधीच भविष्यवाणी करुन ठेवली आहे. 2022 मध्ये पर्सनल कॉम्प्युटरचा मेंदू माणसांवर नियंत्रण ठेवेल अशी भविष्यवाणी नास्त्रेदमसने केली आहे. मानवी इंटरफेससह कृत्रिम बुद्धिमत्तेचा संगणक असेल आणि रोबोट मानवजातीचा नाश करतील असा दावा त्याने या भविष्यवाणीत केला आहे.