Twitter Logo Changed: ट्विटरचा ब्लू बर्ड उडाला.. Elon Musk यांचा विचित्र निर्णय, नवीन लोगो कोणता? पहा

Twitter Logo Changed: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरचा लोगो (Twitter Logo) बदलला आहे. त्यामुळे युझर्स हैराण झाल्याचं पहायला मिळतंय.

Updated: Apr 4, 2023, 07:04 PM IST
Twitter Logo Changed: ट्विटरचा ब्लू बर्ड उडाला.. Elon Musk यांचा विचित्र निर्णय, नवीन लोगो कोणता? पहा  title=
Twitter Logo, Elon Musk

Twitter Logo changed: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी कोणत्या ना गोष्टीमुळे चर्चेत असतात. अतरंगी कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कामाची काहीजण स्तुती करतात. तर काहीजण त्यांच्यावर टीका करताना दिसतात. अशातच आता एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नेटकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. एलॉन मस्क यांनी तडकाफडकी निर्णय घेत ट्विटरचा लोगो (Twitter Logo) बदलला आहे.

ट्विटरचा लोगो बदलला

ट्विटर म्हटलं की सर्वांच्याच्या डोळ्यासमोर निळ्या चिमणीचा लोगो (Blue Bird) दिसतो. मात्र, आता मस्क यांनी सर्वांच्याच नजरा बदलण्याचा निर्णय घेतलाय. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो (Doge icon) ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. मस्क यांच्या निर्णयामुळे काहींना हसू देखील आवरता आलं नाही. त्यावर आता मीम्स देखील शेअर केले जात आहेत. (Elon Musk changed Twitter Logo from Blue Bird to Doge icon latest marathi news)

Elon Musk यांचं हटके ट्विट 

ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवल्यानंतर ट्विटर हॅक झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, रात्री एलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर सर्वकाही स्पष्ट झालं. ट्विटरच्या निर्णयानंतर निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी  (Elon Musk Tweet) एक मीम शेअर केलं. त्यात एक श्वान कार चालवताना दिसतोय. एक श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेला दिसतोय आणि तो वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवतो.

पाहा ट्विट 

दरम्यान, श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगतोय, ज्यामध्ये जुन्या आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) चा फोटो आहे. सर्वांना प्रथम हे एप्रिल फूल असल्याचं वाटत होतं. मात्र, ट्विटरच्या वेब पेजवर आणि ट्विटरचं होम बटण देखील बदलण्यात आलं आहे. डॉज (Doge) इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, डॉज हे क्रिप्टोकरन्सीचं प्रतिक आहे.