Edible Oil Price : वर्षभरात खाद्यतेलाचे भाव एवढे वाढण्यास कारणंही तसंच आहे...

 महागड्या खाद्यतेलाच्या किंमतीमुळे स्वयंपाकाची चवच खराब झाली आहे, असे म्हणावे लागेल. त्यात पाम तेलाचे दर विक्रमी उच्च पातळीवर पोहोचले आहे. सोयाबीन, सोया तेलाच्या किंमतींनी महागाईचा नवा उच्चांक गाठला आहे.

Updated: Mar 9, 2021, 10:58 PM IST
Edible Oil Price : वर्षभरात खाद्यतेलाचे भाव एवढे वाढण्यास कारणंही तसंच आहे... title=

मुंबई : जनतेला महागाईपासून काही दिलासा मिळत नाही. पेट्रोल आणि डिझेलबरोबरच खाद्य तेलांच्या वाढत्या किमती लोकांना त्रास देत आहे. महागड्या खाद्यतेलाच्या किंमतीमुळे स्वयंपाकाची चवच खराब झाली आहे, असे म्हणावे लागेल. खाद्यतेलाच्या किंमती गेल्या वर्षभरात  30 ते 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यात पाम तेलाचे दर विक्रमी उच्च पातळीवर पोहोचले आहे. सोयाबीन, सोया तेलाच्या किंमतींनी महागाईचा नवा उच्चांक गाठला आहे.

खाद्यतेल एवढं का महागलं?
कोरोनाकाळात जगभर फूड ऑयल पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. तसेच, इंधनासाठी पाम तेलाच्या मागणीत वाढ दिसून आली आहे, तर सोयाबीनची मागणीही चीनमध्ये वाढत आहे. ब्राझील, अर्जेंटिनामध्ये पामशेती मोठ्या प्रमाणात केली जाते, पण या वेळी खराब हवामानाचा परिणाम दरावर झाला आहे.

सणांच्या आणि लग्नाच्या हंगामात  खाद्य तेलाच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते. ज्यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महागाईच कारण पाम आणि सूर्यफूलाचे तेल आहे
वृत्तानुसार भारतीय भाजीपाला - तेल उत्पादक संघटनेचे (IVPA) अध्यक्ष सुधाकर देसाई यांचे म्हणणे आहे की, फेब्रुवारी महिन्यात भाव वाढीचे कारण पाम तेल आणि सूर्यफूलाचे तेल होते. ब्राझीलमधील हवामान खूपच खराब झाले होते, त्यामुळे अशी परिस्थिती आहे की सूर्यफूलाचे तेल 1700 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत फेब्रुवारीत कच्चा माल खूप कमी आला होता, फक्त 4 लाख टन पाम आणि 4 लाख टन सोयाची आवक झाली. एप्रिल-मे पर्यंत तेलाचे बाजार भाव घसरण्याची शक्यता नाही. आताच्या परिस्थितीत, अशी अपेक्षा केली जाऊ शकते की आपल्याला, अजून २ महिन्यासाठी खाद्यतेलासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.