WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक

WhatsApp link : Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामुळे कंपनी यूजर्सच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करते.

Updated: Jun 5, 2023, 04:39 PM IST
WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक  title=
do not click this WhatsApp link

WhatsApp Alert : Whatsapp हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. याच व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. व्हॉट्सअॅप कंपनी युजर्सना सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय खास आणि पॉवरफुल फीचर्सचे पर्याय दिलेले आहेत. पण खरं तर, व्हॉट्सअॅपवरही बऱ्यादा बग येतच असतात. त्यामुळे अॅप क्रॅश होऊ शकतो. अँड्रॉइड ऑथॉरिटीने दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपवर सध्या एक बग आहे. हे बग वैयक्तिकरित्या किंवा विशिष्ट लिंक असलेल्या ग्रुपमध्ये येतो. या या लिंकमुळे अँड्रॉइड डिव्हाइस क्रॅश झाल्याच्या तक्रारी आहेत.

व्हॉट्सअॅप वापरताना काही किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागते. व्हॉट्सअॅपमधील बगमुळे अँड्रॉइड अॅप क्रॅश झाल्याचा अहवाल अँड्रॉइड ऑथॉरिटीने दिला आहे. WhatsApp वापरकर्ते wa.me/settings लिंक उघडतात तेव्हा हा बग ट्रिगर होऊ शकतो. या लिंकवरून WhatsApp सेटिंग पेज ओपन होते. मात्र सध्या ही लिंक ओपन झाल्यावर अँड्रॉइड डिव्हाइसेस क्रॅश होतात. या बगचा व्हॉट्सअॅप चॅटवर परिणाम होतो. त्याचबरोबर लिंक ओपन केल्याने व्हॉट्सअॅप क्रॅश होते.  

जर तुम्हाला अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्याच समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. कंपनीने हा बग दूर केला आहे. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

कोणत्या व्हॉट्सअॅप व्हर्जनवर परिणाम होतो? 

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तुम्ही चॅट उघडण्यासाठी चॅटमध्ये दिसणार्‍या लिंकवर क्लिक करता तेव्हा संपूर्ण व्हॉट्सअॅप क्रॅश होते. पण काही वेळाने अॅप रिस्टार्ट झाले असते. हा हा बग Android साठी WhatsApp च्या आवृत्ती 2.23.10.77 वर परिणाम करत असल्याची नोंद आहे आणि इतर व्हर्जनवरमध्ये देखील बग येऊ शकतो.

व्हॉट्सअॅप बग कसा दुरुस्त करायचा?

तुम्हाला अजूनही अॅप क्रॅश होण्याची समस्या येत असल्यास, तुम्ही व्हॉट्सअॅप वेब ब्राउझर व्हर्जन वापरू शकता. कारणामुळे या बगमुळे, WhatsApp वेबवर कोणताही परिणाम नाही. यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करून मेसेज डिलीट करू शकता म्हणजेच लिंकमुळे अॅप क्रॅश होतो. यानंतर जोपर्यंत तुम्हाला पुन्हा दोषपूर्ण लिंक मिळत नाही तोपर्यंत WhatsApp क्रॅश होणार नाही. तसेच Google Play Store वरून तुमचे अॅप अपडेट करणे हा एक चांगला मार्ग आहे. तसेच अनोळखी नंबर किंवा ज्ञात नंबरवरून कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नका.