नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी आता बाजारात आणखीन एक फोन येत आहे. या फोनची किंमत केवळ २९९ रुपये असणार आहे. जाणून घ्या या फोनचे फीचर्स...
टेलिकॉम सेक्टर आणि इंटरनेट डेटा क्रांती यांच्यातील तफावतीचा थेट फायदा ग्राहकांना मिळत असल्याचं दिसत आहे. रिलायन्स जिओतर्फे ४जी फीचर फोन १५०० रुपयांत लाँच करण्यात आला. या फोनबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकताही आहे. मात्र, आता याच स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी एक नवा फोन आला आहे.
होय, बाजारात आता २९९ रुपयांच्या किमतीत फोन उपलब्ध झाला आहे. या नव्या आणि स्वस्त फोनचं नाव आहे 'डी१' (Detel D1). जाणकारांच्या माहितीनुसार, हा नवा फोन बाजारात येणा-या रिलायन्सच्या 4जी फीचर फोनला टक्कर देणार आहे. हा फोन तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरुन खरेदी करता येणार नाही तर तो तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येईल.
जर तुम्हालाही हा स्वस्त फोन घ्यायचा आहे तर तुम्ही कंपनीच्या detel-india.com या वेबसाईटवरुन खरेदी करु शकता. कंपनीतर्फे फोनची किंमत २६६.९६ रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, जीएसटी लागू झाल्याने या फोनची किंमत २९९ रुपये होत आहे. फोनच्या फीचर्स संदर्भात आपण विचार केला तर यामध्ये १.४४ इंचाचा ब्लॅक अॅड व्हाईट डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच ६५०mAHची बॅटरीही देण्यात आली आहे.
या फोनमध्ये सिंगल सिमकार्ड असणार आहे. तसेच टॉर्चही देण्यात आलेली आहे. यामध्ये वायब्रेशन मोड आणि लाऊड स्पिकरही देण्यात आलेला आहे.
फोनचा फोटो
२९९ रुपयांत मिळणारा Detel D1 हा फोन खरेदी करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबपेज ओपन झाल्यावर तुम्हाला फोनची किंमत आणि फीचर्स दिसतील. मात्र, फोनची डिलिव्हरी सर्वत्र उपलब्ध नाहीये. तुमच्या परिसरात फोनची डिलिव्हरी होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुमचा पिनकोड वेबसाईटवर टाकून तुम्ही तपासू शकता.