Cheapest EV In India: फ्रान्समधील कार निर्मिती करणारी कंपनी सिट्रोएनने (Citroen) सोमवारी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. ही इलेक्ट्रिक कार कंपनीची सर्वात स्वस्त कार म्हणून ओळख असलेल्या सिट्रोएन सी थ्री (Citroen C3) या गाडीचं हे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या गाडीला ई सी थ्री (eC3) असं नाव देण्यात आलं आहे. ही नवी इलेक्ट्रिक कार देशामधील सध्याची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक कार टाटा टिआगो ईव्हीला (Tata Tiago EV) थेट टक्कर देणार आहे.
सिट्रोएनने या कारमध्ये 29.2 केडब्लूएच एलएफपी बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी फूल चार्जिंगवर 320 किमीपर्यंतचं अंतर पार करु शकते असं कंपनीचं म्हणणं आहे. ही रेंज सध्याच्या टाटाच्या टियागो ईव्हीपेक्षा अधिक आहे. या ईव्हीमध्ये सिंगल फ्रंट एक्सेल-माउंटेड मोटार असून त्यामधून 56 बीपीएच ऊर्जा निर्माण होते. गाडीचं इंजिन 143 एनएमपर्यंतचं पीक टॉर्क जनरेट करतं. या गाडीची टॉप स्पीड 107 किमी प्रति तास इतकी आहे. ड्रायव्हिंग मोड, ईको आणि स्टॅण्डर्ड असे तीन ड्रायव्हिंग मोडचे पर्याय देण्यात आले आहेत. यात रीजनरेटीव्ह ब्रेकिंग यंत्रणा देण्यात आली आहे. या कारमध्ये तब्बल 13 कलरचे पर्याय उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रिक कारच्या फिचर्समध्ये स्प्लिट हेडलॅम्प, एलईडी डीआरएस, चार स्पीकर्स, 10.2 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, वायरलेस कनेक्टीव्हिटी, स्टेअरिंग माऊटेड कंट्रोल यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार चार वेगवगेळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सि्ट्रोन नवीन ई-सी 3 ऑल-इलेक्ट्रिक वर माय सिट्रोन कनेक्ट आणि सी-बडी सारखी कनेक्टिव्हिटी अॅप्स देखील लॉन्च करणार आहे. आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध असतील,माय सिट्रोन कनेक्टमध्ये 35 स्मार्ट फिचर्स असतील त्यात ड्रायव्हिंग बिहेवियर अॅनॅलिसीस, व्हेईकल ट्रॅकिंग, इमर्जन्सी सर्व्हिस कॉल्स, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन्स, ओव्हर द एअर सॉफ्टवेअर अपडेट्स, युज बेस इशुरन्स पॅरामीटर्स आणि ७ वर्षांचे सबक्रिप्शन ही वैशिष्ट्ये पहावयास मिळतील.
ई सी थ्री ची बेस प्राइज 11 लाख 50 हजार इतकी असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. अर्थात ही किंमत टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीपेक्षा अधिक आहे. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 12.43 लाखांपर्यंत जाते. टाटाच्या टियागो ईव्हीची किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरु होते. ई सी थ्रीमधील लाइव्ह मॉडेलची किंमत 11.50 लाख रुपये असून फील मॉडेलची किंमत 12.13 लाख इतकी आहे. याशिवाय फिल (वाइव्ह पॅक) मॉडेलची किंमत 12.28 लाख रुपये इतकी आहे. फीलची (ड्युएल टोन) किंमत 12.43 लाख इतकी आहे.
नवीन सिट्रोन ई-सी 3 ऑल-इलेक्ट्रिक नवी दिल्ली, गुडगाव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, कोची, चेन्नई, चंदीगड, जयपूर, लखनौ, भुवनेश्वर, सुरत, नागपूर, विझाग, कालिकत, गुवाहाटी, भोपाळ, कर्नाल, डेहराडून, राजकोट, मंगलोर आणि कोईम्बतूर या २५ शहरांमध्ये ला मेसन सिट्रोन फिजीटल शोरूममध्ये किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ई सी थ्रीची सध्याच्या सी थ्री हॅचबॅकचं इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. ई सी थ्रीची किंमत 11.50 लाखांपासून सुरु होते. ई सी थ्री मुख्यपणे टियागो ईव्हीला टक्कर देईल. सी थ्री भारतीय बाजारपेठेमध्ये टाटा पंचला टक्कर देत आहे. आता सिट्रोएनची एकच कार टाटाच्या दोन मॉडेलसाठी आव्हान ठरणार आहे. सध्या या फ्रेंच कंपनीचं भारतामध्ये फार मोठं नेटवर्क नाही. मात्र या कंपनीच्या कार्सला चांगली मागणी आहे.