झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर?   

Updated: Mar 30, 2023, 11:49 AM IST
झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?  title=
BMW cars X3 20d xLine features and price in marathi

BMW X3 20d xLine Price & Features: स्वत:ची कार हवी... असं उगाचच तुम्ही कधी स्वत:शीच बोलला आहात का? बोलल असालच. हे म्हणजे जणू तुम्ही तुमच्या स्वप्नांशीच संवाद साधत होतात. किंबहुना तुमच्यापैकी काहीजणांनी या स्वप्नांचा पाठलाग करणंही सुरु केलं असेल. थोडक्यात शिक्षणानंतर मनाजोगी नोकरी आणि घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांनीच आपला मोर्चा आता स्वत:च्या कारकडे वळवला असेल. अर्थात घर, कार यापैकी कुणाला कधी प्राधान्य द्यायचं हा प्रत्येकासाठी वेगळा विषय. पण, कार घेण्याचं स्वप्न मात्र अमेकजण पाहतात हे नाकारता येत नाही. 

बऱ्याचदा काही कार आपल्या मनात इतक्या भरतात की, त्यांची किंमत कितीही जास्त असली तरीही एक दिवस खरेदी करेनच असा विश्वासच आपण स्वत:लाच देत असतो. अशाच काही dream Cars पैकी एक म्हणजे BMW कंपनीची कार.

लहानपणापासून काही कंपन्यांच्या कार पाहत आपण मोठे होतो, यातही काही ब्रँड्स, कंपन्यांना आपली विशेष पसंती असते. BMW  ही त्यातलीच एक. कोट्यवधींच्या घरात किंमत असणाऱ्या या कार आपल्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत असं म्हणणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. कारण, BMW नं त्यातल्या त्यात स्वस्त एसयूव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीची किंमत 67.5 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळं आता तुम्हाला नेमके किती पैसे साठवायचेयत याचा अंदाज आलाच असेल. 

काय आहेत या कारची वैशिष्ट्य? 

2-लीटर, 4-सिलेंडर, टर्बो-डीजल इंजिन असणारी ही कार 190bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क असं आऊटपूट देतेय. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार ही कार 7.9 सेकंदांमध्ये 0-100kph इतका वेग घेते. 213 किमी प्रतीतास ही तिची कमाल वेगमर्यादा आहे. 

हेसुद्धा वाचा : Kia EV9: एका चार्जिंगमध्ये तब्बल 541 किमीचा मायलेज; फक्त 15 मिनिटात फूल चार्ज! सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV

 

BMW X3 xLine मध्ये तुम्हाला एक्स3 पॅनारोमिक ग्लास रुफ, बीएमडब्ल्यू आईड्राइव सिस्टम आणि 12.3 इंच इंफोटेनमेंट युनिटसह हार्मन-कार्डन साउंड सिस्टमही मिळतं. 3डी व्यू सराउंड कॅमेरा, जेस्चर कंट्रोल आणि हेड-अप डिस्प्ले असेही फिचर्स या कारमध्ये आहेत. 

LED हेडलाईट सेटअप असणाऱ्या या कारमध्ये बाकी गोष्टी जुन्या मॉडेलसारख्याच आहेत. या कारमध्ये अॅल्यूमीनियम-फिनिश रूफ रेल्सही आहेत. शिवाय कारला, 19 इंचांचे अलॉय व्हील्सही आहेत. काय मग, तुम्ही ही Dream Car कधी घेताय?