iPhone 14 लॉन्च होताच मोठी बातमी, कंपनीला बसेल 440 व्होल्ट्सचा झटका

आयफोन 14 लॉन्च (iPhone 14 Launch) करण्यात आला.  ज्यामध्ये टॉप क्लास फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.   

Updated: Sep 8, 2022, 06:05 PM IST
iPhone 14 लॉन्च होताच मोठी बातमी, कंपनीला बसेल 440 व्होल्ट्सचा झटका title=

मुंबई : ग्लोबल मार्केटमध्ये मोठ्या धुमधडाक्यात  आयफोन 14 लॉन्च (iPhone 14 Launch) करण्यात आला.  ज्यामध्ये टॉप क्लास फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.  सोबतच अफलातून डीझाईनही आहे. आयफोनच्या टॉप मॉडेलची किंमत 80 हजार रुपयांपासून ते लाखांच्या घरात आहे. ही किंमत अनेकांना जास्त वाटू शकते. दरम्यान आयफोनच्या लेटेस्ट मॉडेलसारखा दिसणारा एक स्मार्टफोन आहे. याची किंमत जाणून घेतल्यावर तुम्ही उडून जाल. खरं तर आपण ज्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत तो iPhone 14 ची रेप्लिका (apple iPhone Replica Model) आहे. (big news came as soon as launch of iPhone 14 knowing the shock of 440 volts)

डुप्लीकेट मॉडल 

आपण ज्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत तो Gionee G13 Pro आहे.  त्याची रचना iPhone 14 सारखी दिसते. डिझाईनच्या बाबतीत हा स्मार्टफोन मागील बाजूने अगदी लेटेस्ट आयफोनसारखा दिसतो. पण जर आपण इतर वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, ते एंट्री लेव्हल स्मार्टफोनसारखेच आहे.  त्यामुळे आपल्याला डिझाइनच्या बाबतीत समान वैशिष्ट्ये मिळतील. 

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.26-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. Gionee G13 Pro चा बेस व्हेरिएंट 4GB RAM आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. त्याच्या दुसऱ्या वेरिएंटमध्ये 4GB RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन HarmonyOS वर काम करतो.

Gionee G13 Pro कॅमरा

स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी सेन्सर 13MP आहे आणि दुसरा सेन्सर मॅक्रो सेन्सर आहे. यामध्ये तुम्हाला सेल्फी घेण्यासाठी 5MP फ्रंट कॅमेरा देखील दिला जाईल. हा फोन 4G सेवा असलेला स्मार्टफोन आहे जो Unisock T310 SoC वर काम करतो.

बॅटरी आणि इतर फीचर्स

या Gionee च्या स्मार्टफोनमध्ये 3500mAh इतकी बॅटरी आहे. हा बॅटरी बॅकअप कदाचित खूप कमी वाटेल.  कारण बाजारात एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहेत ज्यात 5000mAh बॅटरी आहे. यात एक एल्डरली मोड आहे जो वापरकर्त्यांना फॉन्ट वाढवण्यास आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य आणि पेमेंट कोडची सुविधा देतं.