मुंबई : मोबाईलमुळे मानवी जीवन अगदी सुसह्य झालंय. पण मोबाईलमुळे आपल्याला महत्वाचा डेटा आणि बऱ्याच महत्वाच्या गोष्टी गमावण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण असे काही अॅप्स वापरतात. पण Doctor Webs या एनालिस्टने 10 अशा अॅप्सचा शोध लावलाय जे आपला महत्वपूर्ण डेटा अन् फेसबूक पासवर्ड चोरतायेत. (Android users you are using these 9 apps delete them otherwise you lose your Facebook password and data)
या 10 पैकी 9 अॅप्स हे गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. सिक्योरिट एनालिस्टनुसार, डेटा चोरी करणारे अॅप्सला रोखणारे अॅप्स असं लोकांना सांगितंल जातं. त्यामुळे लोकं डेटा सेफ्टीसाठी हे चोरटेच अॅप्स डाऊनलोड करतात. आतापर्यंत एकूण 5,856,010 इतक्या जणांनी हे बोगल अॅप्स डाऊनलोड केलेत. या अॅप्सविरोधात रिपोर्ट केल्यानंतर गूगलने या 9 अॅप्सला वगळले आहे.
ये ट्रोजन अॅप्स यूझर्सना मूर्खात काढण्यासाठी ट्रीकचा वापर करतात. या अॅप्सना सेटिंगची परवानगी मिळाल्यानंतर फेसबूकच्या वेब पेजचं रुपांतर https://www.facebook.com/login.php वेबव्यूमध्ये केलं जातं. यानंतर या वेबव्यूमध्ये जावा स्क्रीप्ट लोड केली जाते. यानंतर याचा वापर करुन फेसबूक लॉगीन चोरण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर जावा स्क्रीप्ट एनोटेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या आदेशांचं पालन करु फेसबूक लॉगीन आणि पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न करतो.
यानंतर यूझर्स मोबाईलद्वारे फेसबूकवर लॉगीन करतो. तेव्हा तेव्हा या ट्रोजन अॅप्सच्या मदतीने कुकीज चोरल्या जातात. त्यामुळे जर तुमच्या मोबाईलमध्ये 9 झोलर अॅप तातडीने डिलीट करा अन्यथा तुम्हाला तुमचा डेटा अन फेसबूक पासवर्ड गमवावं लागेल. तसेच होणारा मानसिक त्रासही सहन करावा लागेल. हे 9 अॅप्स नक्की कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
PIP Photo, Processing Photo, Rubbish Cleaner, Horoscope Daily, Inwell Fitness, App Lock Keep, Lockit Master, Horoscope Pi आणि App Lock Manager हे किंवा यापैकी कोणताही अॅप तुम्ही इंस्टॉल केला असेल, तर तो याच क्षणी डिलीट करा, अन्यथा तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
संबंधित बातम्या :
WhatsAppचे जबरदस्त फीचर, आता हाय क्वालिटी फोटो शेअर करणे शक्य
Reliance Jio ने जारी केली एमरजन्सी डाटा लोन सुविधा; जाणून घ्या ग्राहकांना असा होईल फायदा