एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये 'हॉटस्पॉट प्राईज वॉर'

रिलायान्स जिओला  टक्कर देण्यासाठी आता एअरटेलदेखील सज्ज झाले आहे. आता एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगल यांच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 4, 2017, 03:35 PM IST
एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये 'हॉटस्पॉट प्राईज वॉर'  title=

मुंबई : रिलायान्स जिओला  टक्कर देण्यासाठी आता एअरटेलदेखील सज्ज झाले आहे. आता एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगल यांच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. 

रिलायंस पाठोपाठ  एअरटेलनने केली कपात 

रिलायंस जिओने ऑक्टोबर महिन्यामध्ये M2S राऊटरची किंमत कमी केली. रिलायन्सपाठोपाठ आता एअरटेलनेदेखील ५० % कपात केली आहे. या दोन्ही आघाडीच्या कंपन्यांनी कपात केल्यानंतर आता टेलिकॉम क्षेत्रामध्ये हॉटस्पॉटचा मुकाबला सुरू होणार आहे.  

९९९ रूपयांमध्ये मिळणार ४ जी हॉटस्पॉट  

एअरटेल ४ जी हॉटस्पॉटची किंमत १९५० रूपये होती. आता यामध्ये ५० % कपात केल्याने केवळ ९९९ रूपयांमध्ये हा हॉटस्पॉट मिळणार आहे. 

१५०० रूपयांमध्ये डोंगल  

एअरटेलचा डोंगल ३००० रूपयांमध्ये उपलब्ध होता. आता ग्राहकांना तो अवघ्या १५०० रूपयांमध्ये मिळणार आहे.  

केरळमध्ये ऑफर  

एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट 999 रूपयांमध्ये उपलब्ध केली आहे. सुरूवातीला  ही ऑफर केरळमध्ये उपलब्ध होती. मात्र नुकसान झाल्याने त्याची किंमत पुन्हा वाढवण्यात आली. मात्र आता थेट जिओशी टक्कर देण्यासाठी हा खास प्लॅन बाजारात आणला आहे.  

नव्या प्लॅनमध्ये काय मिळणार ?  

एअरटेलने १९९ च्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सोय दिली आहे. यामुळे नॅशनल आणि लोकल रोमिंगचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

१९९ च्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी १ जीबी डाटा मिळणार आहे. तसेच  नॅशनल आणि लोकल एसएमएसदेखील फ्री मिळणार आहेत. 

या प्लॅनची व्हॅलिडीडी २८ दिवस आहे. 

दिल्ली, मुंबई, चैन्नई आणि कर्नाटक सर्कलमध्ये हा नवा प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे.