मुंबई : सॅमसंगने आपला महाग स्मार्टफोन डब्ल्यू 2018 लॉन्च केला आहे. कंपनीने चीनमध्ये हा फोन लॉन्च केला आहे.
या स्मार्टफोनची खासियत कॅमेरा आहे. ज्यामध्ये एक एफ/1.5 एपर्चर देण्यात आला आहे. जो कोणत्याही फोनमध्ये दिला जाणाऱ्या फोनपेक्षा सर्वोतम आहे. रेअर कॅमेरा 12 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड नूगट दिले गेले आहे.
या स्मार्टफोनमध्ये 4.2 इंचचा एचडी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी रॅम असून तो क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर सोबत आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज पर्याय उपलब्ध असतील. पहिल्या स्टोरेजची मेमरी 64 जीबी असेल तर दुसऱ्या मेमरीचा स्टोरेज 256 जीबी असेल. यामध्ये 2,300 एमएएचची बॅटरी दिली आहे.
सॅमसंग W2018 मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. सोबतच फिंगरप्रिंट स्कॅनर फोनच्या मागच्या बाजूला आहे. या व्यतिरिक्त बिक्सबीसाठी डेडिकेटेट बटण देण्यात आलं आहे. ग्लास मेटल डिझाइनसह गोल्ड प्लॅटिनम स्मार्टफोनला गोरिला ग्लास देण्यात आला आहे. सॅमसंग W2018 फ्लिप स्मार्टफोनची किंमत जवळपास 1,56000 रुपये आहे.