2024 New Maruti Swift Launch: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आज आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Maruti Swiftची नेक्स्ट जनरेशन मॉडल लाँच केले आहे. कंपनीने आधीपासूनच नवीन स्विफ्टची अधिकृतरित्या बुकिंग सुरू केली आहे. त्यामुळं ज्या ग्राहकांना मारुती स्विफ्ट खरेदी करायची आहे ते कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा डिलरशिपच्या माध्यमातून कार बुक करु शकतात. नवीन मारुती स्विफ्टला पहिल्यांदा जपानमधील मोबिलिटी शोमध्ये सादर करण्यात आली होती.
आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेल्या Maruti Swiftच्या नेक्स्ट जनरेशन मॉडलची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये (एक्स शोरुम) किंमत ठरवण्यात आली आहे. या हॅचबॅक कारमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत. कशी आहे नवी स्विफ्ट कार, पाहूयात.
नवीन स्विफ्टचे डिझाइन आधीसारखेच आहे मात्र आधीपेक्षा जास्त फिचर्स यात अॅड करण्यात आले आहे. या कारमध्ये नवीन बंपर, नवीन डिझाइनचे रेडिएटर ग्रिल देण्यात आले आहे. त्याचबरोबर ब्रँडचा लोगो पहिले ग्रिलच्या मध्ये होता तो आता कारच्या फ्रंट बोनटवर देण्यात आला आहे. नवीन हेडलँप आणि फॉग-लँपदेखील कारच्या फ्रंटला देण्यात आले आहेत. त्यामुळं संपूर्ण कारला फ्रेश लुक येतोय. नवीन स्विफ्ट आधीपेक्षा थोडी मोठी आहे. ही कार सध्याच्या मॉडलच्या तुलनेत 15 मिमी लांब आणि जवळपास 30 मिमी उंच आहे. मात्र, व्हिलबेस आधीसारखाच 2,450 मिमी आहे. कंपनीने नवीन स्विफ्टमध्ये मागील दरवाजाच्यावर हँडलचा C-पिलरला हटवून याला पारंपारिक पद्धतीने दरवाजावर दिले आहे. त्याचबरोबर नवीन डिझाइनमध्ये अलॉय व्हिल अधिक मजबूत केले आहेत.
कारच्या इंटिरियरला स्मार्ट लूक देण्यात आला आहे. कारचे केबिन काही प्रमाणात Fronxशी मिळते-जुळते आहेत. यात फ्री स्टँडिंग इंफोटेंमेंट सिस्टम, नवी स्टाइलचे सेंटर एयर कॉन वेंट्स देण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त कारच्या आत तुम्हाला नवी अपहोल्स्ट्री आणि नवीन डिझाइनचा डॅशबॉर्डदेखील मिळणार आहे.
Maruti Swiftमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे कारचे इंजिन. कंपनीने यात पूर्णपणे नवीन 1.2 लीटरची क्षमता असलेले Z सीरीज इंजिन देण्यात येत आहे. या इंजिनमध्ये 82hpची क्षमता आणि 112 Nmचा टॉर्क जनरेट करते. सध्या जे मॉडेल आहेत त्यात K सीरीजचे इंजिन देण्यात आले आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये 25.72 किमी प्रतिलीटर मायलेज देते. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास 3 किमी/लीटर जास्त आहे.
नवीन मारुती स्विफ्टमध्ये कंपनीने 9 इंचाचा टचस्क्रीन इंन्फोटेंमेट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील भागात AC वेंट्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. ही कार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. यातील सर्व व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग देण्यात येत आहेत. त्याचबरोबर यात इलेक्ट्रोनिक स्टॅबिलिटी कंट्रोलदेखील देण्यात आला आहे.