मुंबई : आपल्या दिवसाची सुरूवातच ही मुळी व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवून होती. आणि जर गोष्ट ही क्रश असणाऱ्या व्यक्तीबाबत असेल तर त्याची गोष्टच वेगळी आहे. क्रश असणाऱ्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहण्यासाठी या व्हॉट्सअॅपची आपल्याला अधिकच मदत होते.
आपल्या आवडीची व्यक्ती जर व्हॉट्सअॅपवर असेल तर त्याचं लास्ट सिन पाहणं किंवा ती व्यक्ती ऑनलाईन आल्यावर आपल्याला मॅसेज येतो का? किंवा आपण पाठवलेला मॅसेज ही व्यक्ती पाहते की नाही? याकडे सतत आपलं लक्ष असतं. त्यामुळे आवडत्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी या 10 गोष्टींचा वापर करा
कधी तरी, काही गोष्टी सोप्यापासून सुरू करणं अधिक चांगल असतं. अशावेळी तुमच्या क्रशशी संवाद साधताना फोटापासून करा. DP मधील या फोटोत तू किती चांगला दिसतोस... यामुळे तुम्ही त्याला नोटीस करताय ही लक्षात येईल.
त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसकडे लक्ष ठेवा. तुमच्या आवडीचं गाणं किंवा तुमच्यासंवादातील एखादा शब्द तर स्टेटसवर नाही ना? याकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच तुमच्या विचारांशी जुळणारं स्टेटस असेल तर तुमचं अर्ध काम झालं असंच समजा...
फक्त शब्दांनी संवाद न साधता इमोजीचा वापर करा. इमोजीचा पण वापर करा. यामुळे तुमच्यातील संवाद हा अतिशय खेळकर आणि मोकळा असेल.
ज्या दिवशी तुमचा मूड चांगला असेल किंवा तुम्ही चांगला मेकअप केला असेल त्या दिवशी सेल्फी काढा. सेल्फी काढून त्या व्यक्तीला पाठवा. यामुळे देखील तुमचा संवाद चांगला सुरू होऊ शकतो.
व्हॉट्सअॅपचा वापर करताना आपल्याला समोरच्याला जे सांगायचं आहे ते हिंटमार्फत सांगण्याचा प्रयत्न करा. सतत प्रोफाईल पिक्चर बदला. तुमच्या क्रशला आवडलेला एखादा फोटो सतत ठेवा किंवा त्यामार्फत संवाद साधा.
जर तुमची क्रश अतिशय मनमिळावू असेल तर व्हॉट्सअॅपवर चांगला संवाद होऊ शकतो. जोक्स किंवा मेमे पाठवून तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्रशसोबत चांगला बॉन्ड निर्माण होईल.
फक्त व्हॉट्सअॅपवर संवाद न ठेवता काही तरी प्लान करा. आवडी निवडी सारख्या असतील तर एखाद्या कार्यक्रमाला ठरवून भेटा. चांगली कलाकृती पाहा.
जर तुम्ही कुठे बिझी असाल आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिस करत असाल तर तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर करा. म्हणजे जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला आवडणार असेल तर तुम्ही भेटाल.
अनेकदा मॅसेजपेक्षा तुमच्या आवाजाची जादू जास्त चालते. त्यामुळे काही निरोप असेल तर Voice Note पाठवून संवाद साधा
अनेकदा फक्त सेल्फी काढून पाठवण्यापेक्षा व्हिडिओ चॅट करा. तुमचा संवाद अधिक चांगला होईल.