zee24taas

देशाच्या परिस्थितीवर काय बोलणार सरसंघचालक? संघाचा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय असतो. देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात. देशातली सध्याची परिस्थिती पाहता उद्या होत असलेल्या या उत्सवाला महत्त्व प्राप्त झालंय. 

Oct 21, 2015, 11:00 PM IST

नागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तुरूंग शिपायानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात उघड झालीय. चंद्रपूर जिल्हा तुरूंगात नोकरीला असलेल्या राजू वानखेडे नावाच्या शिपायानं आपल्या नागपूर इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय रजा मंजूर झाली नसल्यानं तीन महिन्यांचा पगार निघाला नाही. त्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप वानखेडे यांच्या कुटुंबियांनी केलाय. 

Oct 21, 2015, 10:50 PM IST

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज, शिवसेनेचा निशाणा भाजपवर?

यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडतोय. पावसामुळं हुकलेल्या वर्धापन दिनाच्या खेळीची कसर भरुन काढण्याची तयारी शिवसैनिकांनी केलीय. शिवसेना भाजप वादामुळे अवघ्या देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलंय.

Oct 21, 2015, 10:23 PM IST

लज्जास्पद: भाजप नेत्याची पक्षातील महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 21, 2015, 09:38 PM IST

अहो आपली प्राजू आता आता 'टॉलिवूड'मध्येही दिसणार!

प्राजू म्हणून जी घराघरात पोहोचली ती केतकी माटेगावकर... 'शाळा'मध्ये साधी, दोन वेण्या घातलेली आणि 'टाईमपास'मध्ये दगडूच्या प्रेमात पडलेली प्राजक्ता आता टॉलिवूडमध्ये अभिनय करतांना दिसणार आहे.

Oct 21, 2015, 09:09 PM IST

आपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा

लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.

Oct 21, 2015, 08:38 PM IST

दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम मोदी, भाजप आणि आरएसएस करतंय - राहुल गांधी

हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झालेल्या जळित कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज भेट घेतली. पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले. 

Oct 21, 2015, 08:01 PM IST