देशाच्या परिस्थितीवर काय बोलणार सरसंघचालक? संघाचा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय असतो. देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात. देशातली सध्याची परिस्थिती पाहता उद्या होत असलेल्या या उत्सवाला महत्त्व प्राप्त झालंय. 

Updated: Oct 21, 2015, 11:26 PM IST
देशाच्या परिस्थितीवर काय बोलणार सरसंघचालक? संघाचा विजयादशमी उत्सव title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय असतो. देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात. देशातली सध्याची परिस्थिती पाहता उद्या होत असलेल्या या उत्सवाला महत्त्व प्राप्त झालंय. 

१९२५मध्ये विजया दशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तेव्हापासून विजया दशमीच्या कार्यक्रमाची आणि सरसंघचालकांच्या भाषणाची ही परंपरा ९० वर्ष अखंड सुरू आहे. संघाच्या कार्यपद्धतीप्रमाणे सहा उत्सव साजरे केले जातात. त्यात विजयादशमी उत्सवाला महत्त्व आहे. देशातल्या विविध मुद्द्यावर सरसंघचालक काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष्य असतं.

केंद्र सरकारच्या निती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर साजरा होणाऱ्या या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी संघ परिवारातले अनेक प्रमुख नेते आणि राजकीय पुढारी उपस्थित असणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.