लज्जास्पद: भाजप नेत्याची पक्षातील महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: Oct 21, 2015, 09:38 PM IST
लज्जास्पद: भाजप नेत्याची पक्षातील महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण title=

दमण: भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

दिवमधील भाजपा नेते नवीन पटेल आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी बैठकीनिमित्त एकत्र आले होते. हॉटेलच्या पॅसेजमध्ये नवीन पटेल यांनी महिला नगरसेविका सिंपल काटेला यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं. सिंपल यांनी यासंबंधी पटेल यांना जाब विचारला. मात्र काही क्षणातच या दोघांमध्ये चक्क हाणामारी सुरु झाली.

नवीन पटेल यांनी महिला नगरसेविका लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अखेरीस उपस्थितांनी या दोघांना थांबवलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीप्रकरणी सिंपल यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून या दोघांमध्ये स्थानिक निवडणुकीतील पराभवाचा वाद होता, असं कळतंय.

पाहा व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.