yediyurappa

हेलिकॉप्टर उतरत असतानाच प्लास्टिक उडालं अन्... कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

BS Yediyurappa : राजकारणातून निवृत्ती घेतलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सध्या भाजपच्या प्रचारात सर्वात पुढे आहेत. मात्र प्रचारादरम्यान झालेल्या अपघातामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे

Mar 6, 2023, 01:32 PM IST

१३ आमदारांचे राजीनामे, शेट्टर सरकार अडचणीत

कर्नाटकातील भाजप सरकार संकटात सापडलंय. येडियुरप्पा समर्थक १३ आमदारांनी राजीनामे देण्याचा इशारा दिल्यानं जगदीश शेट्टर सरकार अडचणीत आलंय.

Jan 25, 2013, 09:40 PM IST

भाजपा सोडताना अखेर येदियुरप्पा रडले

भाजपामधील वादग्रस्त नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी अखेर भाजपाचा निरोप घेतला आहे. मात्र भाजपामधून बाहेर पडताना येदियुरप्पांनाही रडू कोसळलं.

Nov 30, 2012, 05:25 PM IST

सदानंद गौडांची राजीनाम्यास टाळाटाळ

भाजपपुढील कर्नाटकाची डोकेदुखी अजूनही संपत नाहीये. पक्षनेतृत्वानं जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला असला तरी सदानंद गौडांनी मात्र मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहेत. गौडांनी सलग दुस-या दिवशी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला दांडी मारलीय.

Jul 10, 2012, 08:31 PM IST

जगदीश शेट्टर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांची वर्णी लावण्यात येडियुरप्पा यशस्वी झालेत. भाजप कोअर कमिटीच्या याबाबत निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलय.

Jul 7, 2012, 10:09 PM IST

कर्नाटकात 'गौडा' सरकार आणखी अडचणीत

कर्नाटकात भाजपच्या गौडा सरकारसमोरील संकटात वाढ झाली आहे. येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. सदानंद गौडा यांची मुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करुन जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात येतेय.

Jun 30, 2012, 07:15 PM IST

येडियुरप्पा पुन्हा कोठडीत जाणार?

केंद्रीय चौकशी आयोगानं म्हणजेच सीबीआयच्या एका कोर्टानं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. येडियुरप्पांसोबतच त्यांच्या अवैध उत्खनन घोटाळ्यातील इतर नातेवाईकांचा अटकपूर्व जामीन अर्जही सीबीआयनं फेटाळलाय.

Jun 13, 2012, 06:48 PM IST

येडियुरप्पा यांना जामीन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा जामीन अर्ज आज कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजूर केला.

Nov 8, 2011, 08:24 AM IST

येडियुरप्पा इस्पितळातून जेलमध्ये

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. बंगळुरूच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना १६ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती.

Oct 19, 2011, 06:53 AM IST