कर्नाटकात 'गौडा' सरकार आणखी अडचणीत

कर्नाटकात भाजपच्या गौडा सरकारसमोरील संकटात वाढ झाली आहे. येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. सदानंद गौडा यांची मुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करुन जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात येतेय.

Updated: Jun 30, 2012, 07:15 PM IST

www.24taas.com, बंगळुरू

कर्नाटकात भाजपच्या गौडा सरकारसमोरील संकटात वाढ झाली आहे. येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. सदानंद गौडा यांची मुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करुन जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात येतेय.

भाजपकडून मात्र या ९ मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार देण्यात आलाय. यातच २ गौडा समर्थक मंत्रीही राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत. सदानंद गौडा यांनी या परिस्थितीत कर्नाटकच्या राज्यपालांची भेट घेतली.

पक्षश्रेष्ठींनीही या वादाची दखल घेतली असून, भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान हे कर्नाटकात पोहचले असून, येडियुरप्पांशी चर्चा करण्याती शक्यता आहे. याबाबत पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.