अक्षय-ट्विंकलच्या `घर आयी एक नन्ही परी`
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना कन्यारत्न झाले आहे. आता अक्षय ट्विंकल आणि आरव यांचं तीन जणांचं कुटुंब चार जणांचं बनलं आहे. आरवचं वय वर्षं १० आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्विंकलने मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती चांगली आहे.
Sep 25, 2012, 12:15 PM IST'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल
बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.
Jul 29, 2012, 01:36 PM IST