tur dal issue

अमरावतीमध्ये तूर खरेदीचं रडगाणं सुरुच

तूर खरेदीचं रडगाणं अमरावतीत अद्याप संपलेलं नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ते दीड महिन्यांपासून तूर विक्रीसाठी आलेले हजारो शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. तुरीचे हजारो पोते बाजार समिती आवारात बेवारस पडलेले आहेत. पोते फाटल्याने तूर वाया जात आहे. तर काही पोते चोरीला गेल्याच्याही तक्रारी आहेत.

Apr 30, 2017, 08:29 AM IST

सरकारकडून दिलासा नाही, तूर खरेदीचा प्रश्न चिघळणार

तूर उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलं आहे.

Apr 24, 2017, 04:31 PM IST