transport

पाहा पंतप्रधान मोदींच्या समोरील मोठी आव्हानं

पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींच्या समोर भारतीय अर्थव्यवस्थेळा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. मागील 10 वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून खाली आले आहेत. जो की एक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेत आशा निर्माण केलीय आणि आता त्यांच्यासमोर सर्व आव्हानं दूर करण्याचंच मोठं आव्हान आहे.

May 27, 2014, 06:11 PM IST

मुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत

मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

May 7, 2014, 06:25 PM IST

माळशेज घाटातील वाहतूक बंदच

माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Aug 2, 2013, 01:24 PM IST

माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू

कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.

Aug 1, 2013, 10:05 AM IST

रेल्वे प्रशासनाने केला कांद्याचा वांदा!

भारतीय रेल्वे प्रशासनानं कांद्याचा वांदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळं उत्तरेत कांदा पोहचू शकलेला नाही. त्यामुळं उत्तरेतल्या राज्यांत कांदा महागला आहे.

Feb 5, 2013, 09:24 PM IST

मनसेचा 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे'वर राडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रस्ता रोको केला. यावेळी आंदोनलकांनी गाड्याची तोडफोड केली.

Jan 31, 2013, 03:39 PM IST

पुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी

पुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी ठरलाय. कात्रज- स्वारगेट- हडपसर मार्गावर सुरु करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय राज्य सरकारच्या अंदाज समितीच्या व्यक्त केलाय.

Dec 3, 2011, 05:58 PM IST