tehelka

पुन्हा तहलका... शिवसेनाप्रमुखांचा दहशतवादी म्हणून उल्लेख, नवा वाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त लेख लिहिणाऱ्या तहलका मासिकाला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुल्लेखानं मारलं आहे. तहलका मासिक कुठे आहे. त्याचा एक संपादक लैंगिक शोषण प्रकरणात सध्या तुरुंगात आहे की बाहेर आलाय असे प्रश्न विचारत, उद्धव ठाकरे यांनी तहलकाबाबत उदासिनता दाखवली. 

Aug 16, 2015, 10:56 PM IST

अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक

तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

Nov 30, 2013, 10:31 PM IST

तेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?

आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.

Nov 30, 2013, 02:37 PM IST

तरुण तेजपालांची अटक उद्यापर्यंत टळली

सहकारी तरुणीवरील लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाचे तरुण तेजपाल यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. तेजपाल यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तेजपाल यांची अटक टळलीय.

Nov 29, 2013, 08:36 PM IST

तेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत, शोमा चौधरी यांचा राजीनामा

तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.

Nov 28, 2013, 12:29 PM IST

सेक्स स्कँडल : तेजपालला कोर्टाकडून दिलासा नाहीच

‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही.

Nov 27, 2013, 07:14 PM IST

लाचप्रकरणी भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु दोषी

भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना एक लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या विशेष सीबीआयच्या न्यायालयात उद्या शनिवारी शिक्षेबाबत फैसला होणार आहे. त्यामुळे बंगारू यांना काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे.

Apr 27, 2012, 03:45 PM IST