shiv sena

काँग्रेसच्या जाहिरातीत ‘शिव’ला शोधणाऱ्यानं ‘शिवसेने’ला शोधलं

सध्या टिव्हीवर सर्वच पक्षांच्या निवडणूक जाहिरातींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातील काँग्रेसची एक नवीन जाहिरात आहे. त्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी ‘शिव’ नावाच्या मेकॅनिकला शोधत असतो. पण तोच अनिकेत विश्वासराव शिवसेनेचा प्रचार करतोय. म्हणजे खरोखरच त्यानं ‘शिव’सेनेला शोधलं म्हणायचं.

Oct 8, 2014, 11:20 AM IST

मोदींवर टीका, 'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती !

'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती ! अहो, हा महाराष्ट्र आहे. या मथळ्याखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. काय लिहिलंय सामनामध्ये.

Oct 7, 2014, 11:34 AM IST

भाजप विरोधासाठी राज-उद्धव एकत्र?

भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय. 

Oct 6, 2014, 03:52 PM IST

‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले

माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

Oct 6, 2014, 03:00 PM IST