भाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा

अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Updated: Nov 1, 2014, 08:30 PM IST
भाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा title=

मुंबई : अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

दरम्यान, शिवसेनेशी सकारात्मक चर्चा सुरु आहे. आम्ही त्यांना सोबत घेणार आहोत. उद्धवजी काल समारंभाला आलेत त्यातून चांगला संदेश गेला. मी त्यांचे आभार मानलेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

३२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजप शिवसेनेला १० मंत्रिपदे देणार असल्याचं समजतंय. शिवसेना मात्र ११ मंत्रिपदांवर ठाम असून ६ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदांची मागणी शिवसेनेनं केलीय. १२ नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. त्यामुळं त्यापूर्वीच सत्तेत वाटा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.    

विश्वासदर्शक ठरावाच्या कठीण परीक्षेला राज्यसरकारला १० ते १२ तारखेला होणा-या विशेष अधिवेशनात होणार आहे.. १२ तारखेला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल तसंच त्यावर मतदान होईल. खातेवाटप लवकरच होईल, शिवसेनेसोबतही चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे अशी माहिती आज सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. 

ऊर्जा वित्त आणि कृषी विभागाने आज सादरीकरण केलं. पोलीस महासंचालक संजीव दय़ाळ यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली. दरम्यान, भाजपचे ३९ जणांचे मंत्रिमंडळ असण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेला १४ मंत्रीपदे अपेक्षित असल्याची माहिती सेना सूत्रांकडून मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.