school bus

रेल्वे-स्कूलबसची धडक, 13 विद्यार्थी ठार

एका रेल्वे फाटकावर स्कूल बस आणि रेल्वेची टक्कर झाल्याने 13 शाळकरी मुलांसह ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 19 मुलं जखमी झाले आहेत.

Jul 24, 2014, 01:01 PM IST

विद्यार्थिनीवर एकानं केला बलात्कार, दुसऱ्यानं दिला पहारा

राज्यात स्त्रियाचं काय पण लहान मुलंही सुरक्षित नसल्याचा सत्य उघड करणारी ही आणखीन एक घटना... पुण्यातील वानवडी परिसरात अकरा वर्षीय मुलीवर तिच्या स्कूलबसच्या सहाय्यकानंच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय.

Apr 18, 2014, 03:58 PM IST

स्कूल बस रस्त्यावर तरीही मुंबईकरांचे हाल, टॅक्सीकडून लूट

बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल 40 ते 45 लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय.

Apr 2, 2014, 12:05 PM IST

ठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोड

ठाण्यातले माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे यांच्या पाळीव कुत्र्याला स्कूलबसची धडक लागली. त्यात तो कुत्रा जखमी झाला. त्यामुळं संतापलेल्या फडतरेंच्या कार्यकर्त्यांनी रॅम्बो स्कूलच्या दोन बसेस फोडल्या.

Jan 13, 2014, 02:22 PM IST

‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!

स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.

Nov 20, 2013, 07:04 PM IST

मुख्याध्यापकांनी झिडकारली स्कूलबसची जबाबदारी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारच्या कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापकांनाच जबाबदार ठरवले आहे. याबाबतचे परिपत्रक लागू करण्यात आलं आहे. दरम्यान वाहतुकीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर असल्यानं याबाबतची सर्व जबाबदारी स्विकारण्यास मुख्याध्यापकांनी नकार दिलाय.

Nov 19, 2013, 03:20 PM IST

चार वर्षांच्या चिमुरडीवर स्कूलबसमध्ये बलात्कार!

दिल्ली गँगरेप आरोपींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दोन दिवसही उलटले नाहीत तर मुंबईत अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर स्कूलबसच्या क्लिनरनं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय.

Sep 15, 2013, 10:09 AM IST

दलदलीत अडकली स्कूल बस, ४० मुले सुखरूप

मीरारोडमधल्या वल्लभभाई पटेल शाळेची बस सकाळी दलदलीत अडकली होती. बस अडकली त्यावेळी बसमध्ये 30 ते 40 मुलं होती. रामदेव पार्क परिसरात रस्त्याच काम सुरूय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दलदल झालीय.

Jun 14, 2013, 10:33 PM IST

स्कूलबसनं चिरडलं, गर्भवती महिलेचा मृत्यू, ४ जखमी

भरधाव स्कूलबसने पाच जणांना चिरडलंय. यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. तर इतर चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय.

Mar 26, 2013, 08:49 AM IST

स्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!

स्कूल बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेमध्ये १२ लहानग्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पंजाबच्या जालंधर शहरातल्या नकोदर क्षेत्रानजीकच्या जहीर गावात सोमवारी सकाळी ही घटना घडलीय.

Mar 4, 2013, 11:09 AM IST

महागाई चटका चिमुरड्यांनाही

डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ आता स्कूलबसची भाडेवाढही होणार आहे... स्कूलबसचं भाडं ३० ते ३५ रूपयांनी वाढणार आहे.

Sep 14, 2012, 09:44 AM IST

दोन स्कूल बसची धडक, १० विद्यार्थी जखमी

पुण्यात स्कूल बसचालकांचा बेदरकारपणा पुन्हा समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका स्कूल बसनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुसऱ्या स्कूलबसला मागून धडक दिली आहे.

Jul 5, 2012, 10:19 AM IST

स्कूलबस नियम, संघटनेची ३१ मेची डेडलाईन

www.24taas.com, मुंबई

राज्य सरकारनं स्कूल बसेसच्या सुरक्षेबाबत पुन्हा नवे नियम तयार केलेत. या नियमांवर स्कूल बस असोसिएशननं नाराजी व्यक्त केली आहे. त्यासाठी कोर्टात जाण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ३१ मेची डेडलाईन दिली आहे.

May 11, 2012, 12:19 PM IST