हैदराबाद : एका रेल्वे फाटकावर स्कूल बस आणि रेल्वेची टक्कर झाल्याने 13 शाळकरी मुलांसह ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 19 मुलं जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरूवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मसाईपेठ भागातील रेल्वे फाटकावर झाली.
या बसमध्ये ड्रायव्हर आणि काकाटिया शाळेचे 32 मुलं होती.
जखमी 19 मुलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मसाईपेट रेल्वे फाटकावर बस आली तेव्हा नांदेड एक्स्प्रेस आणि बसची टक्कर झाली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विशेष चौकशीचे आदेश दिले आहेत.
मानवरहित रेल्वे फाटकांवर अपघाताची ही पहिली वेळ नाही, भारतात शेकडो लोकांच्या दरवर्षी अशा घटनांमध्ये मृत्यू होतो. भारतात आजही 11 हजार 563 चौकीदार नसलेले रेल्वे फाटक आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.