मुंबईसह कोकणात समुद्राला उधाण, भरतीचे पाणी रस्त्यावर
मुंबईसह कोकण किणारपट्टीवर आज समुद्राला उधाण आले. समुद्राच्या उंच लाटाने दादर, वरळी या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर रत्नागिरी आणि सिंधुुदुर्गात भरतीचा तडाखा बसला.
Jun 12, 2014, 01:34 PM ISTपुण्यात 3 तासांत झाला 3 किलोमीटर रस्ता तयार...
प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा अनोखा नमुना पुण्यात समोर आलाय. वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याचं काम अवघ्या ३ तासांत पूर्ण करण्यात आलंय. कशी फिरली ही जादूची कांडी? हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर जाणून घ्या...
May 5, 2014, 09:41 PM ISTनाशिकजवळ अपघात ३ ठार
वणी महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. क्वालिस गाडीला ट्रकला दिलेल्या धडकेत तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.
Jan 2, 2014, 05:48 PM ISTकोकणात जाणाऱ्यांच्या गर्दीनं महामार्ग फुलला
गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या वाहनांना गर्दी झाल्याचं चित्र आज सायन-पनवेल मार्गावर पाहायला मिळालं. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना शनिवारपासूनच ही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.
Sep 9, 2013, 04:27 PM ISTमुंबई अजूनही ‘खड्ड्यात’!
मुंबई महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याची दिलेली 25 ऑगस्टची डेडलाईन संपलीय. अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डयांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळं गणेशमूर्ती मंडपात घेवून येताना गणेशोत्सव मंडळांना त्रास होतोय.
Aug 27, 2013, 09:03 AM ISTमुंबईकरांनो उद्यापासून ‘खड्डे’ गायब?
मुंबईकरांसाठी तशी खुशखबर आहे. मात्र ही न्यूज खरंच खुशखबर ठरते का यासाठी मुंबईकरांनो तुम्हाला उद्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण सोमवारपासून मुंबईकरांना मुंबईतल्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. हे आम्ही नाही म्हणत... तर असा दावा पालिकेनं केला होता.
Aug 25, 2013, 02:08 PM ISTकाळ्या यादीऐवजी मुंबईतील रस्त्यांचे कंत्राट
मुंबई महापालिकेचा अजब कारभार ! निकृष्ठ काम करणा-या कॉ़न्ट्रॅक्टरवर पालिका मेहेरबान ! काळ्या यादीत टाकण्याऐवजी दिली कोट्यवधीची कामे !
Aug 3, 2013, 12:22 PM ISTउद्धव ठाकरेंची दिलगिरीही ‘खड्ड्यात’!
उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करुन २४ तासही उलटत नाहीत, तोच खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांनी ठाकरे यांची दिलगिरीही खड्ड्यात घातलीय.
Jul 31, 2013, 01:31 PM ISTनिकृष्ट बांधकामामुळे चौपदरी रस्ता खचला
औद्योगिक शहर असलेलं चंद्रपूर आंध्रप्रदेशाशी जोडलं जावं यासाठी सुमारे 100 किमी लांबीचा चार पदरी रस्ता बांधला जातोय. पण चंद्रपूरजवळच ताडाळी या गावी मधोमध हा रस्ता खचलाय. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सदोष बांधकाम आणि निकृष्ट दर्जामुळे वादाच्या भोव-यात सापडलाय.
Jul 26, 2012, 05:09 PM ISTअरेरे... मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी अंत
नवी मुंबईतल्या सानपाडा परिसरात खड्ड्यात पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर एक विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेतोय. इथे एका इमारतीचं बांधकाम करण्यासाठी ५० फूट खोल खड्डा खणला होता त्यात पावसाचं पाणी साचलं होतं.
Jun 25, 2012, 11:14 PM ISTसेनेने रस्त्यावरच बुलडोझर फिरवला
पुण्यात वादग्रस्त बीआरटीविरोधात शिवसैनिकांनी आज आंदोलन केले. शिवसैनिकांनी हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल ४०० ते ५०० मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला. या आंदोलनामुळे नवा वाद निर्णाण होण्याची शक्यता आहे. अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना काहीही करता आले नाही. त्यामुळे रस्ता उखडण्यापर्यंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मजल गेली.
Mar 27, 2012, 06:11 PM ISTनांदेडचे रस्ते नेदरलॅंडसारखे.... वापर मात्र शून्य
परदेशातील योजनांचे अनुकरण करताना बऱ्याच वेळा आपण आपले हसे करुन घेतो, याचे उदाहरण म्हणून नांदेडमधल्या रस्ते विकास योजनकडे पाहता येईल. नेदरलँडच्या धर्तीवर कोट्यवधी रुपये खर्चून चार पदरी रस्ते बनवले खरे, मात्र ज्या हेतूसाठी ते बनवले ते हेतू पूर्ण होताना दिसत नाही.
Dec 18, 2011, 04:30 AM IST