www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
मुंबई महापालिकेचा अजब कारभार ! निकृष्ठ काम करणा-या कॉ़न्ट्रॅक्टरवर पालिका मेहेरबान ! काळ्या यादीत टाकण्याऐवजी दिली कोट्यवधीची कामे !
मुंबई महापालिकेनं निकृष्ट दर्जाचं काम करणा-या कॉन्ट्रॅक्टर्सवर कारवाई करत फक्त धुळफेक केलीय. झी मीडियाच्या हाती त्याचे पुरावे लागलेत. कॉन्ट्रॅक्टर्सना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट मिळत असल्याचं उघड झालंय.
रस्त्यांची दुरुस्ती,सिमेंट क़ॉन्क्रेटीकरण तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजण्यासाठी मुंबई महालिकेडून काही कंत्राटदारांना २००८पासून कोट्यवधीची कामे देण्यात आली आहे.मात्र आठ कंत्राटदारांनी निकृष्ठ दर्जाची कामे केल्याचं उघड झाल्यामुळे महापालिकेनं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलीय. ५०० रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत हा दंड ठोठावलाय.
महावीर रोडस् इन्फ्रास्ट्रक्चर, नवदीप कंन्स्ट्रक्शन, जेकेएन एंटरप्राईज, आर.के मदान, न्यू इंडिया कंन्स्ट्रक्शन, रूपेश कार्पोरेशन, मुकेश ब्रदर्स, प्रकाश इंजिनिअरिंग हेच ते कंत्राटदार. ज्यांना निकृष्ठ काम केल्याबद्दल महापालिकेनं दंड ठोठावलाय.
वारंवार निकृष्ठ काम केल्यामुळं खरं तर या कंत्राटदारांना महापालिकेनं काळ्या यादीत टाकायला हवं होतं..मात्र तसं न करता या कंत्राटदारांना महापालिकेनं पुन्हा कोट्यवधीच्या कामांची बक्षिसी दिलीय..ही धक्कादाय बाब माहितीच्या अधिकारात उघड झालीय.
निकृष्ठ काम करणा-या या आठ कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी पालिका अधिकारी,नगरसेवक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.