सेनेने रस्त्यावरच बुलडोझर फिरवला

पुण्यात वादग्रस्त बीआरटीविरोधात शिवसैनिकांनी आज आंदोलन केले. शिवसैनिकांनी हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल ४०० ते ५०० मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला. या आंदोलनामुळे नवा वाद निर्णाण होण्याची शक्यता आहे. अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना काहीही करता आले नाही. त्यामुळे रस्ता उखडण्यापर्यंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मजल गेली.

Updated: Mar 27, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात वादग्रस्त बीआरटीविरोधात शिवसैनिकांनी आज आंदोलन केले. शिवसैनिकांनी हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल ४०० ते ५०० मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला. या आंदोलनामुळे नवा वाद निर्णाण होण्याची शक्यता आहे. अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना काहीही करता आले नाही. त्यामुळे रस्ता उखडण्यापर्यंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मजल गेली.

शिवेसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. बीआरटीचा प्रकल्प पुण्यात अपयशी ठरला असून बीआरटीमुळं पुण्यात अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. केवळ हडपसर मार्गावर ९० पेक्षा जास्त अपघात झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही  हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल ५०० मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला, असे शिवेसेनेचे म्हणणे आहे.

बीआरटीचा प्रकल्प पुण्यात अपयशी ठरला असून बीआरटीमुळं पुण्यात अपघातांचं प्रमाण वाढले आहे.  केवळ हडपसर मार्गावर ९० पेक्षा जास्त अपघात झाले आहेत.  नवनिर्वाचित महापौर वैशाली बनकर यांनी वाढत्या अपघातांचं खापर वाहतूक पोलिसांवर फोडल आहे. तसंच शिवसेनेचं आंदोलन गैर असल्याचीही टीका केलीय.