रत्नागिरी - जिवंत जाळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
सहा जणांच्या टोळक्या नं पेट्रोल आणि रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या हरिश्चंद्र पेव्हेकर या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रत्नागिरीत मुख्य रस्त्यावर कुवारबावजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या आवारात पेव्हेकर पेटलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती.
Oct 7, 2013, 03:34 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-रोहा स्पेशल गाडी
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दीपासून सुटका होण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्पेशल गाडी दि. २२ सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येत आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान ही गाडी धावणार आहे. गर्दीमुळे ही गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Sep 21, 2013, 02:55 PM ISTउद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात
रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.
Sep 18, 2013, 11:16 AM ISTरायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम
रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.
Jul 25, 2013, 04:48 PM ISTपाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!
मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.
Jul 25, 2013, 10:05 AM ISTकोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम
कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.
Jul 24, 2013, 02:09 PM ISTकोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
Jul 23, 2013, 04:21 PM ISTकोकणात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.
Jul 23, 2013, 10:49 AM ISTकोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून
कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.
Jul 3, 2013, 04:10 PM ISTकोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.
Jul 3, 2013, 08:30 AM ISTआली हो, राजापूरची गंगा
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.
Jun 26, 2013, 04:05 PM ISTकोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती
विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.
Jun 25, 2013, 02:26 PM ISTखेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार
रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Jun 24, 2013, 03:16 PM ISTभास्कर जाधव ओसाड गावाचा पाटील – रामदास कदम
शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
Jun 20, 2013, 10:12 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Jun 9, 2013, 10:22 AM IST