www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
सहा जणांच्या टोळक्या नं पेट्रोल आणि रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या हरिश्चंद्र पेव्हेकर या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रत्नागिरीत मुख्य रस्त्यावर कुवारबावजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या आवारात पेव्हेकर पेटलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती.
रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील सुरक्षा शाखेत काम करणाऱ्या ५६ वर्षीय पेव्हेकर यांचा काही वर्षांपासून नात्यातीलच काहींशी जमिनीवरून वाद सुरू होता. त्यातूनच हा हल्ला झाल्याचं माहिती मिळतेय. पोलीस उपनिरीक्षक पेव्हेकर यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीनुसार या प्रकरणी राजेंद्र गावडे आणि सुनील पवार या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता कुवारबाव भागात कामानिमित्त बोलावून हरिश्चंद्र पेव्हेकर यांना पेटविण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला. हा पोलीस कर्मचारी जवळपास ९० टक्के भाजला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.