www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
गुहागरमधील पराभावानंतर रामदास कदम हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय झाले नव्हते. त्यांचा पहिलाच मेळावा भास्कर जाधव यांच्या चिपळुणात झाला. यावेळी जाधव यांच्यावर शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला. २०१४च्या निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज आहे. पुढची सत्ता ही शिवसेना - भाजपयुतीची असेल असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. मी गृहमंत्री झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करीन असे ही ते यावेळी म्हणाले.
भास्कर जाधवांना प्रदेशाध्यक्षपद देऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना गाजर दाखवलं आहे. भास्कर जाधव जिथे जिथे राज्यात सभा घेतील, त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी मी ही सभा घेणार आहे. त्याचबरोबर २०१४ च्या निवडणुकीत गुहागर मतदार संघातून शिवसेना २५ हजार मताधिक्याने निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला.
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. पुढची सत्ता आमची आहे. त्यामुळे जाधव-राणे यांचे काहीही चालणार नाही. जाधव हे शिमग्यात ढोल बडवतात आणि कपडे काढून नांगर धरता. हे सर्व पेपरात फोटो आणण्यासाठी चाललेलं असत. आम्हीही शेतकरी आहोत. पण असं काहीही करत नाही, असा टोला जाधव यांना कदम यांनी हाणला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.