pune police

पुणे पोलिसांनी पकडलेले बाईकचोर निघाले दहशतवादी, दोघांनाही अटक; 5 लाखांचं होतं बक्षीस

Pune Crime: वाहन चोरी प्रकरणात पोलिसांनी कोथरुड (Kothrud) परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक केलं आहे. तपास करताना त्यांच्याकडे सापडलेली सामग्री ही दहशतवादी असल्याचं दर्शवत होती. याप्रकरणी तपास सुरु असून एटीएसही (Maharashtra Anti Terrorism Squad) सहभागी झालं आहे.

 

 

Jul 19, 2023, 08:48 AM IST

जमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके

Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Jul 17, 2023, 10:31 AM IST

कडाक्याची थंडी, माशांचा त्रास अन्... पोटच्या मुलीला रस्त्यावर टाकून आईने काढला पळ

Pune Crime : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याने जाताना एका पादचाऱ्याला लाकडी बॉक्समध्ये ही चिमुकली मुलगी सापडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या आईचा शोध सुरु आहे.

Jul 16, 2023, 08:58 AM IST

मंगळवारी शेवटचे दिसले, 8 महिन्यात कोणीच भेटायला आले नाही...; रवींद्र महाजनींचे शेजारी काय म्हणाले?

Ravindra Mahajani Death : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने खळबळ उडवली आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरातच सापडल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jul 15, 2023, 01:28 PM IST

सरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस

Junnar News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Jul 15, 2023, 12:12 PM IST

शरद पवार यांचा फोटो, जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही अन्.. पत्नीसह लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर अटक

Pune Crime : वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून 53 लाख रोख उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकर नावाच्या तरुणाने तब्बल 18 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Jul 14, 2023, 02:54 PM IST

पुण्यात कोयत्या गँगने कळस गाठला, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुण्यात कोयत्या गँगची दहशत वाढतच चालली आहे. कोयता दाखवून धमक्या दिल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत असतानाच आता कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jul 14, 2023, 02:21 PM IST

झोपेतच पतीला संपवण्याचा प्रयत्न; पत्नीनं अंगावर ओतलं उकळतं पाणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील वारजे भागातील एका सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे.झोपेत असतानाच पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

Jul 14, 2023, 10:36 AM IST

Pune News: पुणेकरांनो पोलिसांना सूचना द्यायच्यात? आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 'हा' Whatsapp नंबर

Pune Police News: तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झालेत. आता थेट तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप सेवा (Whatsapp Number) पुणे पोलिसांनी सुरू केलीये.

Jul 10, 2023, 09:06 PM IST

मेहबुब पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हाती लागले मुख्य आरोपी

Pune Crime : जेजुरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करत पानसरे यांची हत्या करण्यात आली होती.

 

Jul 9, 2023, 03:12 PM IST

संतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे

आम्ही मुलांना इथे शिकण्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्याचेच काम केले पाहिजे. आम्ही एवढ्या मोठ्या शाळेत त्यांना पाठवतो आणि मुलींच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण आता ते कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली आहे.

Jul 6, 2023, 11:30 AM IST

घाईघाईत पुणे विमानतळाबाहेर पडत होती, पोलिसांची तिच्यावर नजर पडली, तपासणीत प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलं...

पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोलिसांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 20 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

Jul 4, 2023, 02:41 PM IST

आधी लैंगिक अत्याचार, नंतर हातात आढळल्या तब्बल 18 सुया; पुण्यात अल्पवयीन मुलासोबत क्रूरकृत्य

Pune Crime : पुण्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मुलाच्या हातात तब्बल 18 सुया आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Jul 4, 2023, 08:11 AM IST

पुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला

Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्याच्या एका घरात कोयता विकण्यावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांवरच वार केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Jul 2, 2023, 10:10 AM IST