कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलेकडून शेजारच्या मुलावर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यात एका महिलेने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Aug 21, 2023, 11:31 AM IST
कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलेकडून शेजारच्या मुलावर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

सागर गायकवाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. अशातच सांस्कृतिक शहर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंढव्यात (kondhwa) अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने अल्पवयीन मुलाला याचा व्हिडीओ देखील काढण्यास सांगितले होते.

कोरोना काळात पतीचे निधन झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्या प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाची व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन तरुण आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच होती. त्याच दरम्यान या महिलेने जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसांत देईल अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती. त्यानंतर मुलासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण कृत्याचा तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप देखील या तरुणाला काढण्यासाठी भाग पाडले होते. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला होता. 

दरम्यान, या महिलेच्या मोबाईलमध्ये या सगळ्या प्रकाराची अश्लील क्लिप असल्याचे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना समजले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.