Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. कोथरुड परिसरात 18 जुलैला पहाटे चार वाजता दहशतवाद्याला पकडण्यात आलं. दहशतवादी युनिस पोलिसांना चकवा देत पळत होता. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याला पकडलं. या झटापटीत एका कॉन्स्टेबलचा फोन नाल्यामध्ये पडला. मात्र कॉन्स्टेबल बाला रफिक शेख यांनी दहशतवाद्याला पाठलाग करुन पकडलं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या टीममधल्या कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण, अमोल नजन, बाला रफिक शेख आणि मंगेश शेळके यांनी ही कारवाई केलीय. (Pune Kothrud Terrorist Police CCTV video Pune Terrorist News Update in marathi today zee24 tass exclusive )
पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीय...दहशतवादी कारवायांत सासरा, मेव्हणा आणि जावयाचा कट असल्याचं उघड झालंय...महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणातील झुल्फिकार अली बडोदावाला आणि अदनानली सरकार हा नातेवाईक आहे...झुल्फिकार अली बडोदावालाचा मेहुणा हा अदनानली सरकार आहे...आणि अदनानलीचा सासरा अली बदोडावाला हा संशयित दहशतवादी मॉड्युलचे मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे...झुल्फिकार आणि अदनानली हे दर्स म्हणजे प्रवचनाच्या नावाखाली तरूणांना धर्मांची चुकीची माहिती द्यायचे...त्यांची माथी भडकवायची कामं करायचे...झुल्फिकार सध्या एटीएस कोठडीत असून, सरकार हा एनआयए कोठडीत आहे...तर झुल्फिकारचे वडील अली बडोदावाला गुजरात जेलमध्ये आहे...