pune municipal election

CMच्या सभेला रिकाम्या खुर्च्या, भाजपवर सभा गुंडळण्याची नामुष्की

शहरातील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. सभा गुंडळण्याची नामुष्की भाजपवर आली.

Feb 18, 2017, 03:23 PM IST

आमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला

शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

Feb 11, 2017, 05:19 PM IST

मनसेच्या उमेदवाराला कोर्टाचा मोठा दिलासा, अर्ज वैध

महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

Feb 11, 2017, 12:13 AM IST

पुण्यात साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद

राजकीय पक्षांनी उमेदवारी वाटपात घातलेल्या घोळामुळे आणि उमेदवारांकडून राहिलेल्या काही त्रुटींमुळे पुण्यातल्या साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेयत. 

Feb 5, 2017, 01:44 PM IST

पुण्यात भाजप उमेदवारांना मोठा धक्का, दोघांचे एबी फॉर्म बाद

रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपने उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आलेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.

Feb 4, 2017, 11:33 PM IST