पुण्यात भाजप उमेदवारांना मोठा धक्का, दोघांचे एबी फॉर्म बाद

रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपने उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आलेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.

Updated: Feb 4, 2017, 11:47 PM IST
पुण्यात भाजप उमेदवारांना मोठा धक्का, दोघांचे एबी फॉर्म बाद title=

पुणे : रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपने उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आलेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.

रेश्मा भोसलेना धक्का , भाजप तोंडावर रेश्मा भोसले यांनी अर्ज भरताना राष्ट्रवादी च्या नावाने भरला पण बीजेपी चा ए बी फ्रॉम जोडला. पक्षाने रेश्मा भोसले या पक्षाच्या अधिकुत उमेदवार असल्याचे पत्र दिले. पण अर्ज चुकीचा ठरवल्यान त्या पक्षाच्या उमेदवार ठरू शकल्या नाही. सतीश बहिरट यांनाही पक्षाने ए व बी फ्रॉम दिला होता. पण पक्षाने रेश्मा भोसले अधिकुत उमेदवार असल्याचे सांगितल्याने त्यांचा ए बी फ्रॉम रद्द केला  त्यामुळे आता 7अ मधून बीजेपी चा उमेदवार नाही, दोघानाही अपक्ष लढावे लागणार. रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी एेनवेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांचे पती अनिल भोसले राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ऐन वेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्याआधी भाजपचे उमेदवार सतीश बहिरट यांनी आपला अर्ज दाखल केलेला होता. आणि आता सतीश बहिरट आपली उमेदवारी मागे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे कुणाचा अर्ज वैध ठरतो याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी दिलेल्या निर्णयानंतर दोघांचे एबी अर्ज बाद ठरविलेत. अगदी अशीच परिस्थिती धंगेकरांच्याबाबतीत निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रभागात काँग्रेसकडून अस्लम बागवान यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रवी धंगेकर यांनीही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. अजून निर्णय झालेला नाही.