political news in marathi

अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. ज्यांनी 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा विक्रम रचत एक प्रकारचा राजकीय इतिहासच घडवला आहे. 

Jul 2, 2023, 03:51 PM IST

...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

 

Jul 2, 2023, 03:48 PM IST

Maharastra Politics: शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर, उध्‍दव ठाकरे हिट विकेट; अजित पवारांच्या बंडानंतर नारायण राणेंचा टोला!

Narayan Rane on Ajit Pawar Oath: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Jul 2, 2023, 03:43 PM IST

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ

Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Jul 2, 2023, 03:32 PM IST

Ajit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."

Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. 

 

Jul 2, 2023, 03:13 PM IST

''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा

Chandrashekar Bawankule:  दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.

Jul 2, 2023, 02:37 PM IST

अजित पवार की जयंत पाटील? प्रदेशाध्यक्षपदावरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

NCP Sharad Pawar: मंत्रिमंडळाच्या सदस्यांची बैठक होत असते. त्यांचा आताच्या मिटिंगचा काय विषय झालाय याचा तपशील माझ्याकडे नाही, असे शरद पवार म्हणाले.

Jul 2, 2023, 01:16 PM IST

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज?, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घेणार भेट

Eknath Khadse will meet Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज त्यांची भेट घेणार आहेत. मात्र भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. 

Jun 3, 2023, 10:42 AM IST

'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?

Pankaja Munde :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jun 1, 2023, 02:31 PM IST

"माझा काय संबंध....", ED चौकशीला जाण्याआधी जयंत पाटील यांनी ठणकावलं; NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे. 

 

May 22, 2023, 12:08 PM IST

'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 

Apr 27, 2023, 11:32 AM IST

मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य

Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2023, 06:56 PM IST

शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Apr 25, 2023, 06:18 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे. 

Apr 25, 2023, 05:40 PM IST

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP :  सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Apr 14, 2023, 03:49 PM IST