''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा

Chandrashekar Bawankule:  दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: Jul 2, 2023, 07:54 PM IST
''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा

Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथे पोहचले आहेत. तेव्हा आता काहीच वेळात राज्यभवनात शपथविधी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याला दोन मुख्यमंत्री मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी सर्वच मंत्री राजभवनात पोहचले आहेत, तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतं मांडले आहे. 

''देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच देशाचे जे भविष्य आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वातील सर्वात्तम देश बनवण्यासाठी जो संकल्प केला आहे त्यासाठी अजित पवार त्यांच्या आमदारांसह आलेले आहेत. तेव्हा आमच्यासाठी हा एक आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली हे सर्व जण एकत्र आले आहेत.'' असं मतं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच यावेळी किती जणं शपथ घेणार आहेत असा त्यांना प्रश्न विचारला असता. ''शपथविधीनंतर सर्वचत चित्र स्षष्ट होईल. महाराष्ट्राच्या विकासासाठी हे समीकरण जमले आहे.'' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. त्यातून आता सुरू झालेल्या राजकीय भूकंपामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे की ही गद्दारी आहे, बंड आहे का शरद पवारांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आता यापुढील राजकारण कसं असेल आणि त्यामुळे 2024 निवडणुकांच्या वेळी काय चित्र पाहायला मिळणार याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अशाच आता आपल्या या शपथविधीनंतर अजित पवार काय बोलणार? त्यानंतर अजित पवारांची भुमिका काय असेल? सोबत राष्ट्रवादीतील नेते, मविआचे नेते, विरोधी पक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काय प्रतिक्रिया असतील याकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. राजकीय वर्तुळात नक्की याविषयी कशा पद्धतीचे वातावरण असेल याबद्दल थोड्याच वेळात माहिती कळू शकते. 

हेही वाचा - Marathi News LIVE Today : जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड

याविषयी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काय भुमिका घेणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. पहाटेच्या शपथविधीचे दृश्य पुन्हा एकदा राजकीय पटलावर पाहायला मिळाले आहे. आता यामुळे पुढील राजकारणाचे भविष्य काय असेल याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. आज महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे हे नक्की! 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x