pmc

राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.

Oct 8, 2013, 08:09 PM IST

कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.

Oct 3, 2013, 08:54 PM IST

अंगावर नाही फायर सूट, डोक्यावर ३० हजारांचा `मुकूट`!

पुणे महापालिका फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी हेल्मेट खरेदी करतेय. या एका हेल्मेटची किंमत आहे तब्बल तीस हजार आणि अशी तीनशे हेल्मेट महापालिका खरेदी करणार आहे.

Sep 25, 2013, 07:07 PM IST

पुण्यात वाहतुकीचा `कल्ला`, मनपाचा खिशावर डल्ला

तुमच्या खिशावर डल्ला मारण्याची जबरदस्त योजना महापालिकेनं आखलीय. इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अर्थात आयटीएस असं या योजनेचं नाव आहे. वाहतुकीचे नियम न पाळणा-या पुणेकरांकडून हा दंड वसूल होणार आहे. आणि हा सगळा दंड ठेकेदाराच्या खिशात जाणार आहे.

Aug 26, 2013, 07:26 PM IST

मनसेचा गुन्हेगारी स्वातंत्र्यसूर्य(वंशी)!

पुणे महापालिकेनं चक्क चोर, गुन्हेगारांचा सत्कार केलाय. तोही स्वातंत्र्य दिनी.... चोरी, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या व्यक्तीला महापालिकेनं पुण्याच्या लौकिकात भर घालणारी नामवंत व्यक्ती म्हणून गौरवलंय. गुन्हेगारांच्या या सत्कारासाठी शिफारस केली होती ती, मनसेच्या नगरसेवकांनी...

Aug 19, 2013, 06:47 PM IST

पुण्यातील खड्ड्यांचे दोन बळी!

पुण्यातल्या खड्ड्यांमुळे अखेर ज्याची भीती होती, तेच झालंय. पुण्यात खड्यांनी दोघांचा बळी घेतलाय. खड्यांमुळे झालेल्या अपघातात गुरबचनसिंग राजपाल आणि प्रशांत मासळकर यांचा मृत्यू झालाय. तर, राजपाल यांचा मुलगा गंभीर जखमी आहे.

Jul 26, 2013, 08:43 PM IST