pimpri chinchwad

निगडीमधील आधुनिक वटसावित्री...

पिंपरी चिंचवडमधील निगडीमध्ये राहणा-या जनाबाई गोरे. जनाबाई या भागात ओळखल्या जातात त्या एक बांधकाम व्यवसायिक म्हणून. कधीही शाळेत न गेलेल्या आणि अंत्यक प्रतिकूल परिस्थिती मधून आलेल्या जनाबाईंचा सामान्य कामगार ते एक बांधकाम व्यावसायिक हा प्रवास कोणालाही थक्क करणारा असाच.

Jun 12, 2014, 08:06 AM IST

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारपासून रिक्षांची भाडेवाढ

पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महागाईने आधीच त्रस्त जनतेला महिन्याचे बजेट सांभाळतांना कसरत करावी लागणार आहे.

Oct 6, 2013, 05:53 PM IST

पिंपरी-चिंचवडमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक इमारती धोकादायक आहेत. त्यावर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. पण प्रत्यक्षात एकाही इमारतीवर कारवाई झालेली नाही.

Oct 2, 2013, 06:27 PM IST

पिंपरीचे `बॉस` अजित पवारच!

पिंपरी चिंचवड मध्ये होत असलेल्या विविध वादांवर खास शैलीत हल्ला चढवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे सर्वेसर्वा आपणच असल्याचं पुन्हा दाखवून दिलय.

Aug 18, 2013, 09:59 PM IST

अजितदादा आश्वासन पूर्ण करणार?

पुण्यामध्ये वैशाली बनकर यांच्याकडून पक्षानं महापौरपदाचा राजीनामा घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही महापौर बदलाचं वारं वाहू लागलंय. अजित पवारांनीच तसं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता त्यांनी ते पूर्ण करावं, असा सूर उमटू लागलाय.

Aug 13, 2013, 08:02 PM IST

विधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.

Aug 6, 2013, 08:44 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना!

नात्याला आणि मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दोन धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघड झाल्याने शहरवासीय सुन्न झालेत.

Apr 28, 2013, 05:36 PM IST

पंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड!

पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षी जेएनएनयूआरएम (JNNURM) च्या अंतर्गत केलेल्या कामा मूळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते केंद्राचा बेस्ट सिटी चा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्काराच मॅनेज करून घेतला होता, असा गंभीर आरोप करण्यात आलाय.

Mar 20, 2013, 08:27 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये ८ वर्षीय मुलीवर बलात्कार

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा ८ वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आहे. भोसरीमध्ये खंडोबा माळ इथं राहणा-या रामप्रकाश यादव या नराधामानं हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी पीडित मुलीचे कुटुंबीय करत आहेत.

Feb 18, 2013, 08:15 PM IST

तीन नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरीत फ्लेक्सचा महापूर

तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.

Feb 17, 2013, 08:04 PM IST