mumbai toll

चार मिनिटांत टोल घेतला नाही तर वाहनांना मोफत सोडणार; सरकारची मोठी घोषणा

Toll Plaza : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर एमएसआरडीसी प्रशासन खडबडून जागं झालं आहे. त्यामुळे आता टोल नाक्यांवर ज्या वाहनांना टोल भरण्यासाठी चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल त्या वाहनांना टोल न घेता सोडण्यात येणार आहे.

Oct 16, 2023, 08:14 AM IST

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Oct 9, 2023, 02:09 PM IST

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल

Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.

Aug 10, 2023, 07:40 AM IST

मुंबईतील वाहन प्रवेश महाग, १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ

वाहनचालकांना आता टोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईतील वाहन प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. 

Sep 25, 2020, 03:47 PM IST

मुंबईत दुमजली टोल बुथ उभारण्याचा एमएसआरडीसी विचार

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार

Oct 1, 2018, 09:57 AM IST

मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील

भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना  मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.

Dec 15, 2017, 11:34 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली पूर्ण, CMचा टोलमुक्तीचा नारा फोल

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय. 

Mar 8, 2017, 08:49 PM IST