mumbai local train

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Apr 26, 2012, 11:09 AM IST

Exclusive- मेगा हाल

 

 

 

 

 

Apr 24, 2012, 01:19 PM IST

रेल्वे बळींना दोन लाख, अधिकाऱ्यांवर गुन्हे

मुंबईतील लोकलमधल्या गर्दीनं तिघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. सिग्नलचा खांबाची धडक लागल्याने एक जण बाहेर फेकला गेल्या. त्याच्याबरोबर १७जणही रेल्वेबाहेर कोसळले. हे सर्वजण जखमी झालेत. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. लोकल अपघातातील मृतांच्या वारसांना १५ हजारांची तोकडी मदत देणाऱ्या रेल्वेने ही मदत वाढवून दोन लाख रूपयांपर्यंत देण्याचं जाहीर केले आहे. दरम्यान, अधिकरी आणि कर्मचाऱ्यांवर कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

Apr 19, 2012, 06:19 PM IST

लोकलची गर्दी जीवावर.. पडून ३ ठार, १५ जखमी

लोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. २ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.

Apr 19, 2012, 05:19 PM IST

'मरगळलेली म.रे.', ट्रेन ४० मिनिटे उशीराने...

मध्य रेल्वेच्या काल झालेल्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती, ती पूर्ववर्त होण्यासाठी जवळजवळ तीन दिवस लागणारं आहेत. आजही मध्य रेल्वेचा खेळखंडोबा हा सुरूच आहे. आजही मध्य रेल्वे अत्यंत धिम्या गतीने धावत आहे.

Apr 19, 2012, 09:09 AM IST

मुंबईत मेगाब्लॉक, मनमाड मार्गावर लाईनब्लॉक

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीचे काम चालणार आहे. तर मनमाड-नांदेड मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २.३0 ते ६.३0 या वेळेत चिकलठाणा ते करमाडदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येईल.

Apr 14, 2012, 03:31 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक रूळावर

माटुंग्याजवळ आज सकाळी ओव्हरहेड वायरचा खांब झुकल्याने मध्य रेल्वेची वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.

Dec 31, 2011, 12:26 PM IST