मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
मुंबईतील लोकलमधल्या गर्दीनं तिघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. सिग्नलचा खांबाची धडक लागल्याने एक जण बाहेर फेकला गेल्या. त्याच्याबरोबर १७जणही रेल्वेबाहेर कोसळले. हे सर्वजण जखमी झालेत. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. लोकल अपघातातील मृतांच्या वारसांना १५ हजारांची तोकडी मदत देणाऱ्या रेल्वेने ही मदत वाढवून दोन लाख रूपयांपर्यंत देण्याचं जाहीर केले आहे. दरम्यान, अधिकरी आणि कर्मचाऱ्यांवर कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.