कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरातही काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर हजेरी लावून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत दमदार हजेरी लावली आहे.
सलग सुरू असलेल्या पावसाने नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काही भागातील रस्ते झाले पण ज्या रस्त्यावर अजूनही खड्डे आहेत, त्यावरून मार्ग काढताना मात्र वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.