marathi movie

मराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला 'जवान', नेटकरी म्हणाले, 'असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या'

Sharad Kelkar Jawan:  'जवान' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. आता यावेळी एका अभिनेत्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आली आहे. त्यानं शाहरूखचा चित्रपट हा थिएटरमध्ये पायऱ्यांवर बसून पाहिला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

Sep 10, 2023, 12:23 PM IST

शाहीर साबळे यांच्यासोबत फोटोत दिसणारी गोंडस मुलगी कोण माहितीये?

Kedar Shinde Daughter Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक फोटो सोसल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. शाहीर साबळे यांच्यासोबत दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का? 

Sep 5, 2023, 12:25 PM IST

नातवाचे फोटो पाठवल्यानं त्यांनी ब्लॉक केलं कारण...; गश्मीरचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Sep 3, 2023, 01:57 PM IST

हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?'

Prajakta Mali Trolled: प्राजक्ता माळी आपल्या हटके लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. यावेळीही ती चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी तिला एका पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

नागराज मंजुळेंचं खरं नाव माहितीये का? स्वत:च केला खुलासा!

Legal name of Nagraj Manjule: माझ्या मोठ्या चुलत्याला मला दत्तक दिलं होतं. त्यांचं नाव बाबुराव आहे. त्यामुळे माझं कायदेशीर नाव नागराज बाबुराव मंजुळे असं आहे, असं नागराज मंजुळे म्हणतात.

Aug 14, 2023, 03:33 PM IST

क्रिकेटच्या देवालाही Baipan Bhaari Deva ची भुरळ; 'चारू'ला व्हिडीओ कॉलवर म्हणाला की...

Baipan Bhaari Deva : बाईपण भारी देवा या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढ असल्याचं दिसून येतं आहे. मराठमोळा आणि मुंबईकर सचिन तेंडुलकरवरही या चित्रपटाची जादू चालली. 

Aug 7, 2023, 08:43 AM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई!

बाईपण भारी देवा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटातील कलाकारांना पाहून अनेक प्रेक्षकांना त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर दिसत आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पकड पाहता आता आणखी किती कमाई करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर नुकतीच चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली त्यात चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे समोर आलं आहे. 

Jul 21, 2023, 12:18 PM IST

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

'माहेरची साडी' चित्रपटासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं माहिती आहे का?

Maherchi Saree Alka Kubal Fees: 'माहेरची साडी' हा चित्रपट सध्या सर्वत्र तुफान गाजला. त्याचसोबत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. आजही हा चित्रपट आवडीनं पाहिला जातो. चला तर पाहुया की अलका कुबल ज्यांनी या आधी ही फिल्म नाकारली होती त्यांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते? 

Jul 14, 2023, 02:45 PM IST

Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं...

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' या मराठमोळ्या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. पण या चित्रपटाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी काही खास कनेक्शन असल्याचं तुम्हाला माहित आहे का? केदार शिंदे यांनीच केला खुलासा...

Jul 14, 2023, 01:27 PM IST

...अन् माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं; केदार शिंदे यांनी सांगितला बाईपण भारी देवा चित्रपटाचा किस्सा!

Kedar Shinde Emotional: चार वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी (Baipan Bhari Deva Marathi Movie) मी पूर्ण वर्षभर निर्माता शोधत होतो. आता या गोष्टीवर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे, असं शिंदे सांगतात.

Jul 12, 2023, 12:30 AM IST

Subhedar Teaser : 'गड आला पण...,' बहुचर्चित 'सुभेदार' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar Marathi Movie : 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..., सुभेदार या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Jun 21, 2023, 03:46 PM IST

छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा ‘सिंहासनाधिश्वर’ च्या माध्यमातून लवकर येणार रुपेरी पडद्यावर!

Sinhasanadhishwar Marathi Movie On Chhtrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला...  2 जून 2023 रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर तिथेच करण्यात आली चित्रपटाची घोषणा...

Jun 5, 2023, 04:45 PM IST

'द केरळ स्टोरी' फुकट दाखवणाऱ्यांवर भडकले केदार शिंदे, म्हणाले महाराष्ट्रातले नेते...

Kedar Shinde on The Kerala Story: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची तूफान पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या यशावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र मराठी सोडून हिंदी चित्रपट मोफत दाखवणाऱ्यांवर केदार शिंदे चांगलेच भडकले आहेत.

May 8, 2023, 09:23 AM IST

'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Baloch Team Horrifying Experience : 'बलोच' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीमला खूप मोठा आणि अनपेक्षित गोष्टीला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 04:47 PM IST