marathi crime news

गावकऱ्यांना 'त्या' संशयाने पछाडले; वृद्ध जोडप्याचे हात-पाय साखळीने बांधले, झाडाला लटकवले अन्...

Husband-Wife Beaten By Villagers In Suspect On Black Magic: वृद्ध जोडप्याच्या हाता-पायाला साखळीने बांधले त्यांना झाडाला लटकावले अन् बेदम माराहण केल्याची घटना घडली आहे.

Jun 20, 2023, 12:35 PM IST

VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि...

Kerala News : केरळच्या कोवलममध्ये लग्नाच्या काही मिनिटांआधी पोलिसांनी वधूला मंडपातून ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्मातील तरुण आणि तरुणीच्या लग्नाशी संबंधित होती. वधूला पोलिसांनी ओढून नेल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 19, 2023, 04:48 PM IST

साडीला धरुन खेचलं अन् शिड्यांवर...; सुनेची सासूला बेदम मारहाण, मन विषण्ण करणारी घटना CCTVमध्ये कैद

UP Crime : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका सुनेच्या मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने सासूला मारहाण करून जमिनीवर फेकल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी निर्दयी सूनेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jun 19, 2023, 03:46 PM IST

तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा

Punjab Crime : 'डाकू हसीना' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनदीप कौरला पंजाब पोलिसांनी 8 कोटी 49 लाख रुपयांच्या लुटमारीसाठी अटक केली आहे. 10 रुपयांची फ्रुटी पिण्याच्या नादात मनदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मनदीप आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Jun 19, 2023, 12:23 PM IST

तब्बल 72 वर्षांनंतर पुण्यात... हॉटेल वैशालीची खरी मालकी कोणाकडे? 'त्या' बाईंमुळं एकच खळबळ

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असणारं सुप्रसिद्ध वैशाली हॉटेल वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हॉटेल वैशालीबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. बंदुकीच्या धाकावर या हॉटेलची पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेना केला आहे. 

Jun 19, 2023, 11:06 AM IST

पाणीपुरी खायला गेलेल्या मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; दुकानदाराचाही घेतला जीव

Bihar Crime : बिहारमध्ये शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी एका दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षक आणि दुकानदाराचा समावेश आहे.

Jun 18, 2023, 03:48 PM IST

पत्नीचे तिच्याच भावासोबत प्रेमसंबंध; पतीला दारु पाजली अन् काढला काटा

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. पतीला हातोड्याने ठार केल्यानंतर पत्नी प्रियकरासह पळून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे

Jun 18, 2023, 01:41 PM IST

12 तास काम, एकवेळ जेवण अन् रात्री साखळदंडाने बांधून मारहाण; धाराशिवमधून 11 जणांची सुटका

Dharashiv Crime : मजुरांची फसवणूक करत त्यांना कामाच्या ठिकाणी आणून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये उघड झालाय. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून 11 मजुरांची सुटका केली आहे.

Jun 18, 2023, 12:46 PM IST

भावाच्या उधारीमुळे बहिणींनी गमावला जीव, मध्यरात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या

Delhi Crime : दिल्लीतील आरके पुरम परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 2 महिलांना गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना आरके पुरम येथील आंबेडकर वस्ती भागातील आहे.

Jun 18, 2023, 11:53 AM IST

Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Jun 17, 2023, 12:31 PM IST

पोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार

Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी त्याला दवाखान्यात घेऊन न जाता आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले आहेत.

Jun 17, 2023, 11:30 AM IST

संतापजनक! 40 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सासू-सासर्‍यांचेही केले अश्लिल Video Viral

Rajasthan Crime : राजस्थानमधील तब्बल 6 गावांमध्ये त्याची दहशत होती. लग्नसमारंभात ठोलकी वाजणाऱ्या हा तरुण गावातील महिला आणि अल्पवयीन मुलींना आपली शिकार करायचा. मग त्यांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करायचा. या नराधमाने त्याचा सासू सासऱ्यांनीही सोडलं नाही. 

Jun 17, 2023, 09:24 AM IST

धक्कादायक! 500 रुपयांना मुलांची विक्री; 18-18 तास करायला लावायचे काम अन्...

Rajasthan Crime : राजस्थानच्या जयपूरमधून पोलिसांनी 22 मुलांची सुटका केली आहे. या मुलांकडून बालमजुरी करवून घेतली जात होती. या मुलांकडून लाखेपासून दागिने बनवून घेतले जात होते. या मुलांना प्रत्येकी पाचशे रुपयांना विकत घेतल्याचीही माहिती आहे.

Jun 16, 2023, 03:42 PM IST

गावात दहशत माजवणाऱ्या तरुणाला चौघांनी दगडाने ठेचलं; आरोपींचे पोलीस ठाण्यात समर्पण

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या युवकाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार तरुणांनी मिळून या तरुणाला संपवलं आहे. हत्येनंतर आरोपींनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला.

Jun 15, 2023, 06:30 PM IST

महिलांची अंतर्वस्त्रे चोरून टॅरेसवर जायचा अन्....; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Bengaluru Crime : गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पुरुषांकडून महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी केल्याच्या विचित्र घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार बंगळुरूच्या विधान सौधा लेआउटमध्ये घटना घडली आहे.

Jun 15, 2023, 04:44 PM IST