साडीला धरुन खेचलं अन् शिड्यांवर...; सुनेची सासूला बेदम मारहाण, मन विषण्ण करणारी घटना CCTVमध्ये कैद

UP Crime : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका सुनेच्या मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने सासूला मारहाण करून जमिनीवर फेकल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी निर्दयी सूनेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 19, 2023, 03:47 PM IST
साडीला धरुन खेचलं अन् शिड्यांवर...; सुनेची सासूला बेदम मारहाण, मन विषण्ण करणारी घटना CCTVमध्ये कैद title=

Crime News : घरगुती भांडणातून (Domestic Violence) वादावादीच्या घटना घडणं हे सामान्य आहे. पण हे प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर तो चिंतेंचा विषय बनतो. सासू सूनेचं भांडण याला अपवाद नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP Crime) घडलाय. उत्तर प्रदेशातील एका घरात सासू सूनेचं भांडण इतकं टोकाला गेलं की दोघांमध्ये हाणामारी झाली. सुनेनं सासूला बेदम मारहाण करत तिचं डोकं शिड्यांवर आपटलं. मारहाणीचा हा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका सुनेच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. एका सूनेनं सासूला मारहाण करून जमिनीवर ढकल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना बिजनौरच्या साकेत कॉलनीची आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिजनौरमधल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सून तिच्या सासूला मारहाण करताना आणि पायऱ्यांवर डोकं आपटताना दिसत आहे. 

सासू प्रेमवती आणि सून पिंकी यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर पिंकीने प्रेमवतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावरही पिंकीचे समाधान न झाल्याने तिने प्रेमवतीला जोरात ढकलले, त्यामुळे सासूचे डोके पायरीवर आदळले. यामुळे वृद्ध महिलेला दुखापत झाली आणि ती जोरजोरात रडू लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सुनेवर कारवाईची मागणी करण्यात येत होती. व्हिडीओ व्हायरल होताच बिजनौर पोलिसांकडून कारवाई केली आहे. यानंतर पोलिसांनी एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, सासूच्या तक्रारीवरून सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात येत आहे. 

व्हिडीओमध्ये काय आहे?

सुमारे 41 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पिंकी प्रेमवतीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. आधी पिंकी वृद्ध प्रेमवतीला हातात काही वस्तू घेऊन मारते, नंतर सासूचा गळा आणि साडी पकडून तिला ओढते आणि पायऱ्यांवर डोके आपटते. पायऱ्यांवर डोके आपटल्यानंतर, वृद्ध सासू फरशीवर पडते आणि चालायला लागते. यादरम्यान पिंकी काहीवेळाने तिथून निघून जाते आणि त्याचवेळी खोलीतून तिसरी महिला बाहेर येते. तिसरी महिला आल्यानंतर मारहाण करणारी पिंकी गेट उघडून बाहेर जाते.

दरम्यान, दोघी महिला आहेत. सून विसरते की एक दिवस ती देखील सासू होणार आहे. सुनेच्या आधी त्या घरात सासू येते. थोडा आदर आणि आश्रयाच्या बदल्यात तिला काय हवे आहे? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.