maharashtra rain

Maharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)

Apr 30, 2023, 07:39 AM IST

राज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

Apr 29, 2023, 08:27 AM IST

राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी

Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला.  अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. 

Apr 28, 2023, 10:09 AM IST

Maharashtra Weather : राज्याच्या ‘या’ भागात Yellow तर, इथं Orange Alert; देशात हवामानची काय स्थिती ?

Maharashtra Weather : राज्यात यंदाचा मान्सून समाधानकारक असणार, असं म्हटलं जात असतानाच अवकाळी जाणार कधी ते सांगा, असाच सूर नागरिक आळवत आहेत. अवकाळी आणि गारपीटीसंदर्भातील येत्या दिवसांसाठीचे इशारे आधी पाहा आणि मग हा प्रश्न विचारा

Apr 16, 2023, 06:40 AM IST
IMD Alert Maharashtra For Next Five Days Of Heavy Rainfall Hailstrom And Lightening PT56S

Maharashtra Rain | सावधान, पुढचे पाच दिवस गारपिटासह पावसाचा इशारा

IMD Alert Maharashtra For Next Five Days Of Heavy Rainfall Hailstrom And Lightening

Apr 11, 2023, 09:55 AM IST

Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Unseasonal Rain :  अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये  सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत. 

Apr 9, 2023, 10:09 PM IST

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की...

Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

Apr 9, 2023, 08:41 PM IST

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.

Mar 18, 2023, 10:41 PM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस

Maharashtra Weather :  मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.

Mar 18, 2023, 07:23 AM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Weather Updates : राज्यात 15 ते 17  मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (Maharashtra Weather News)

Mar 14, 2023, 10:33 AM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Mar 10, 2023, 08:45 AM IST

पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण

Rain in Dharashiv : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain )  नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे.  तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही  सध्या पावसाची शक्यता आहे.

Mar 7, 2023, 03:49 PM IST

Maharashtra Rain : अवकाळी पावसाने झोडपले, पिक भुईसपाट तर बळीराजा पुरता आर्थिक संकटात

Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे.नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारींवर टाकण्यात आली होती. तीही अवकाळी पावसात भिजल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

Mar 7, 2023, 03:07 PM IST