Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Weather Updates : राज्यात 15 ते 17  मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (Maharashtra Weather News)

Updated: Mar 14, 2023, 10:33 AM IST
Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  title=

Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather Updates ) विजांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. आज मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर 15 ते 17 मार्चदरम्यान विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. (Maharashtra Weather News)

राज्यात आजपासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी धास्तावला आहे. आजपासून विजांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 15 ते 17 मार्चदरम्यान विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.. दक्षिण विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम ,अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जास्त तडाखा बसण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय.. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके वाचवावीत असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलंय.

या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जास्त तडाखा बसणार

दक्षिण विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम ,अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जास्त तडाखा बसण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके वाचवावीत असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे..

नंदुरबारच्या तळोदा शहरात झालेल्या गरपिटीचा फटका एका लग्न सोहळ्याला बसला..लग्न मंडपात जेवण सुरू असताना झालेल्या गारपिट  आणि अवकाळी पावसामुळे चांगलीच धावपळ  उडाली. व-हाड्यांना डोक्यावर खुर्च्या घेऊन  पावसापासून वाचण्याची वेळ आली.  तर नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळलं.

 वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू 

नाशिकच्या नांदगावात वीज पडून शेतक-याचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पाऊस सुरू असताना शेतकरी कांदे झाकण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज पडली.तर आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गहू मळणीची कामे वेगात सुरू आहेत. यंदा अनुकूल हवामानाची साथ मिळाल्याने, तसेच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने गहू उत्पादनात मोठी वाढ झालीय..तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांपासून गहू मळणीची कामे सुरू आहेत.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 43 हजार आंब्याच्या पेट्या दाखल झाल्यात. राज्यातून हापूस आंब्याच्या 30 हजार 383 पेट्या तर परराज्यातून 12 हजार 591 पेट्या दाखल झाल्यात. तापमान वाढत असल्याने यंदा मार्च महिन्यात आंब्याची मागील वर्षी पेक्षा विक्रमी आवक होत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x